शायोमीने बरेच दिवस चर्चा सुरू असलेल्या रेडमी फोन्समधील 64MP कॅमेराबद्दल आज माहिती प्रसिद्ध केली. आज बीजिंगमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात या पहिल्याच 64MP फोन कॅमेराच प्रेझेंटेशन देण्यात आलं. या 64MP कॅमेरासाठी सॅमसंग ISOCELL GW1 कॅमेरा सेन्सरचा वापर केलेला असेल. याचं असेल. प्रत्यक्ष कोणत्या फोन मध्ये याचा वापर होईल याची माहिती मात्र अजून दिलेली नाही.
सध्या फोन बाजारात रोज नव्याने येत असलेल्या फोन्समध्ये 48MP कॅमेरा दिसतो आहेच मात्र आता या नव्या सेन्सरमुळे थेट 64MP असलेले फोन्सही पाहायला मिळतील. आता काहीच दिवसात रियलमीसुद्धा हाच सॅमसंग सेन्सर वापरून त्यांचा 64MP फोन सादर करत आहे!
सॅमसंगच्या ISOCELL GW1 या सेन्सरमध्ये 48MP पेक्षा 38% अधिक पिक्सेल्सचा समावेश आहे. यामुळे अधिक स्पष्ट फोटो काढता येतील असा दावा शायोमीने केला आहे. या सेन्सरचा आकार 1/1.7″ असेल. याच्याद्वारे काढलेल्या फोटोची साईज 19MB पर्यंत असू शकेल!
अधिक मेगापिक्सेल्स म्हणजे अधिक चांगला फोटो असं नसतं याची नोंद मराठीटेकच्या वाचकांनी घ्यावी. सध्या आपण पाहू शकता बऱ्याच फोन्समधील 48MP कॅमेरापेक्षा आयफोन, गॅलक्सी S10 सारख्या फोन्समध्ये कमी मेगापिक्सेल्स असूनही अधिक चांगले फोटो निघतात. अधिक मेगापिक्सेल्स ही बऱ्याच वेळा मार्केटिंगसाठी वापरलेली गोष्ट असते.
याशिवाय शायोमीने सॅमसंगसोबत भागीदारीमध्ये तब्बल 108MP चासुद्धा फोन कॅमेरा लवकरच आणत असल्याच जाहीर केलं आहे! याला त्यांनी अल्ट्रा क्लियर कॅमेरा म्हटलं आहे. याचं रेजोल्यूशन 12032×9024 इतकं मोठं असेल! या सेन्सरचा वापर शक्यतो Xiaomi Mi Mix 4 मध्ये केला जाऊ शकतो असा अंदाज आहे.
Search Terms : Xiaomi annnounces 64MP camera for Redmi Phones with Samsung GW1 Sensor Soon launching 108MP camera too!