सॅमसंग गॅलक्सी नोट १० व नोट १० प्लस सादर : आता अधिक मोठ्या डिस्प्लेसह!

सॅमसंगच्या आज झालेल्या गॅलक्सी अनपॅक्ड कार्यक्रमात Samsung Galaxy Note 10Note 10 Plus हे दोन फोन्स सादर करण्यात आले आहेत. यामध्ये एक ६.३ इंची तर दुसरा ६.८ इंची डिस्प्ले असलेले नोट मालिकेतले नवे फोन्स आहेत. डिस्प्ले व आकार सोडला तर बाकी इतर गोष्टींबाबत या दोन्ही फोन्समध्ये बरंच साम्य आहे. नोट मालिकेमधील फोन्समध्ये आजवर सर्वात मोठा डिस्प्ले या मॉडेल्सद्वारे सॅमसंगने उपलब्ध करून दिला आहे.

Galaxy Note 10 मध्ये 2280×1080 pixels 401ppi डिस्प्ले असून Galaxy Note 10+ मध्ये 3040×1440 pixels 498ppi असलेला डिस्प्ले आहे. दोन्ही डिस्प्ले Dynamic AMOLED असून HDR10+ सपोर्ट आहे. Galaxy Note 10 साठी फक्त 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज असा एकाच पर्याय असेल. (Note 10 मध्ये microSD कार्ड स्लॉट नाही, काही ठिकाणी 5G सोबत 12GB पर्याय उपलब्ध). Galaxy Note 10+ मध्ये microSD कार्ड सपोर्ट असून याच्यात 1TB पर्यंत स्टोरेज असलेलं कार्ड वापरता येईल. याच्यात 12GB रॅम आणि 256GB व 512GB असे दोन स्टोरेज पर्याय मिळतील. दक्षिण कोरियामध्ये 5G आवृत्ती आधी उपलब्ध होईल.

दोन्ही फोन Auro Glow, Aura White व Aura Black या रंगात उपलब्ध असतील. Galaxy Note 10 मध्ये Red व Pink आणि Note 10+ साठी Blue पर्याय सुद्धा आहे. Note 10 मध्ये 3500mAh आणि Note 10+ मध्ये 4300mAh बॅटरी आहे.

Samsung Galaxy Note 10+ मधील काही खास गोष्टी

Samsung Galaxy Note 10+ Specs

डिस्प्ले : 6.8-inch Quad HD+ 3040×1440 (498ppi), HDR10+, Dynamic AMOLED Infinity-O
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 855/Samsung Exynos 9 Octa 9825
रॅम : 12GB
स्टोरेज : 256GB/512GB
कॅमेरा : Ultra Wide: 16MP F2.2 (123°) + Wide-angle: 12MP 2PD AF F1.5/F2.4 OIS (77°) + Telephoto: 12MP F2.1 OIS (45°) + DepthVision Camera: VGA
फ्रंट कॅमेरा : 10MP 2PD AF F2.2 (80°)
बॅटरी : 4300mAh 45W fast charging
ऑपरेटिंग सिस्टिम : Android 9.0 (Pie)
सेन्सर्स : Accelerometer, Barometer, Ultrasonic Fingerprint Sensor, Gyro Sensor, Geomagnetic, Hall, Proximity Sensor, RGB light sensor
इतर : 5G, Bluetooth 5.0, USB Type-C, NFC, 25W charger
रंग : Auro Glow, Aura White, Aura Black, Blue
किंमत : Note 10+ : $1099 (12GB+256GB) $1199 (12GB+512GB)
(Note 10+ ची किंमत भारतात ₹७९९९९ पासून पुढे)
Note 10+ 5G : $1299.99 (12GB+256GB) $1399.99 (12GB+512GB)
Note 10 ची किंमत $949 असेल (भारतात ₹६९९९९)

https://youtu.be/jSsbnMw6xAM

यावेळी सॅमसंगने Galaxy Book S हा लॅपटॉपसुद्धा सादर केला असून हा Qualcomm Snapdragon 8cx आधारित असेल जो जवळपास पूर्ण दिवस बॅटरी लाईफ देतो! यामध्ये 8GB रॅम, 256GB/512GB स्टोरेज, 13.3” FHD TFT डिस्प्ले, 42Whबॅटरी देण्यात आली आहे.

Exit mobile version