शायोमी अजूनही भारतीय स्मार्टफोन बाजारात आपलं वर्चस्व कायम ठेऊन आहे. आयडीसीने जाहीर केलेल्या माहितीनुसार भारतातली स्मार्टफोनची विक्री दुसऱ्या चौमाहीत ३.६९ कोटींवर पोहोचली आहे. हा नवा विक्रम आहे. वार्षिक वाढीची गोष्ट करायची तर ती ९.९ टक्क्यांवर आहे! शायोमीच्या विक्री किंवा प्रत्यक्ष फोन शिपमेंटमध्ये ४.८ टक्क्यांची वाढ पहायला मिळाली तर सॅमसंगनेही १६.६ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. त्यांच्या मध्यम किंमतीच्या फोन्सनी चांगलीच स्पर्धा निर्माण केलेली दिसते. आता एकूण विक्रीमध्ये शायोमी, सॅमसंग, विवो, ओप्पोनंतर ओप्पोचा सबब्रॅंड असलेल्या रिअलमीने (Realme) पाचवा क्रमांक पटलावला आहे! त्यांच्या C2, 3, 3 Pro फोन्समुळे त्यांना हे यश मिळालं आहे.
स्मार्टफोन्सच्या विक्रीमध्ये वेगाने वाढ होत असताना फीचर फोन्सची मागणी आणखी कमी होत आहे. या चौमाहीत गेल्या वर्षीच्या मानाने २६.३ टक्क्यांची घट झाली आहे! 4G फीचर फोन्सनाही मागणी नसल्यामुळे ही घट पहायला मिळाली आहे.
मल्टी चॅनल रिटेलिंग सुरू करूनसुद्धा ऑनलाइन माध्यमांमुळेच स्मार्टफोन विक्रीत वाढ झालेली दिसत आहे. ऑनलाइन माध्यमे नवीन फोन्स, आकर्षक ऑफर्स आणि स्वस्त पर्याय जसे की ईएमआय/कॅशबॅक उपलब्ध करून देत असल्यामुळे लोकांचा त्याकडे कल जास्त दिसून येतो! यंदा ऑनलाइन विक्रीमध्ये १२.४ टक्क्यांची वाढ झाली आहे! अशी माहिती उपासना जोशी असोशिएट रिसर्च मॅनेजर (आयडीसी इंडिया) यांनी दिली आहे. Itel, Infinix, Tecno, Oraimo आणि Spice या ब्रॅंडसची मालकी असणाऱ्या Transsion कंपनीला रिअलमीने गेले काही महीने मागे टाकून या चौमाहीत आपली जागा टॉप ५ मध्ये निश्चित केली आहे. आता उद्या त्यांचा Realme 5 व Realme 5 Pro सादर होणार आहेत!