ट्विटर सीईओचंच ट्विटर अकाऊंट हॅक!

खुद्द ट्विटरचे सीईओ जॅक डॉर्सी यांच ट्विटर अकाऊंट हॅक झालं असून हॅकरने त्यांच्या अकाऊंटवरून बरेच ट्विट्स, रिट्विट्स केल्या आहेत. हे हॅकिंग Chuckle Gang नावाच्या हॅकर ग्रुपने केलं असावं असं सांगण्यात येत आहे. हॅकर्सनी केलेल्या ट्विटसमध्ये त्यांच्या डिस्कॉर्ड प्रोफाइलची लिंक देण्यात आली होती. गेल्या आठवडयात याच ग्रुपने काही यूट्यूबर्स आणि इन्फ्लूएनसर्सची अकाऊंट्स हॅक केली होती.

यापूर्वी फेसबुक संस्थापक मार्क झकरबर्गचंसुद्धा ट्विटर अकाऊंट हॅक झालं होतं. त्यानंतर फेसबुकच्याच View As मुळे त्याचं फेसबुक अकाऊंटसुद्धा हॅक झालं होतं. मात्र त्यावरून काही आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आलं नव्हतं. जॅक डॉर्सी यांच्या ट्विटर अकाऊंटवर मात्र हॅकरने बऱ्याच वर्णद्वेषी ट्विट्स केल्या आहेत. आता या सर्व ट्विटस हटवण्यात आल्या असून झाल्या प्रकाराबद्दल अधिक माहिती मिळवण्याच्या प्रयत्नात आहोत असं ट्विट ट्विटरतर्फे करण्यात आलं आहे. Cloudhopper नावाच्या सोर्सवरून हे ट्विटस करण्यात आल्याच दिसून आलं आहे ही सेवा ट्विटरने काही वर्षांपूर्वी अधिग्रहीत केली होती. एसएमएस संबंधित या सेवेचा वापर करून हे हॅकिंग केलेलं असू शकतं असं The Verge ने त्यांच्या बातमीमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे सिम कार्ड सेवेमधील त्रुटींचा फायदा या हॅकर्सनी घेतलेला असू शकतो!

https://twitter.com/TwitterComms/status/1167528672523210752

शिवाय या हॅकर्सना जॅक डॉर्सी म्हणजे थेट ट्विटर सीईओंच्या प्रायव्हेट मेसेजेसला सुद्धा अॅक्सेस मिळाला असणार आहे. त्यासंबंधीत हॅकर्सनी काय केलं आहे ते काही कालावधी नंतर जाहीर करण्यात येईलच. पण स्वतः सीईओची अकाऊंट अशा प्रकारे हॅक होऊन त्यांच्या गैरवापर होत असेल तर बऱ्याच सामान्य यूजर्ससुद्धा हा प्रकार घडला असणार आहे. बऱ्याचदा ट्विटरकडून चांगल्या अकाऊंट्सना सुद्धा Suspend केलं जातं. (जाणते/अजाणतेपणी) त्यावेळी होणाऱ्या चुकांची जाणीव आतातरी ट्विटरला होईल अशी अपेक्षा..

द्विस्तर पडताळणी (Two Step Verification) सारखे पर्याय वापरुन आपल अकाऊंट सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करू शकतो.

Exit mobile version