कॅमस्कॅनरमध्ये चीनी मॅलवेअर : गूगलने प्ले स्टोअरवरून काढून टाकलं!

Camscanner

आपण जर अँड्रॉइड फोन वापरत असाल तर अॅप्स डाउनलोड करण्यासाठी गूगल प्ले स्टोअरचाच वापर करतो. सुरक्षिततेसाठी ते गरजेचं आहेच कारण गूगल स्वतः या अॅप्सची तपासणी करून प्ले स्टोअरवर उपलब्ध करून देत असतं. पण अलीकडे बऱ्याच चीनी डेव्हलपर्सनी इंस्टॉल केल्यानंतर मागच्या दाराने जाहिराती दाखवणारे/डेटा चोरणारे अॅप्स इंस्टॉल करण्याचा मार्ग शोधला आहे. अशा वाईट उद्देशाने इंस्टॉल केलेल्या अॅप्सना मॅलवेअर म्हणतात. हेच चीनी मॅलवेअर आता Camscanner या तब्बल १० कोटी डाउनलोड्स असलेल्या अॅप्समध्ये सापडले आहेत. हे अॅप डॉक्युमेंट/फोटो स्कॅन करून त्यांची पीडीएफ सेव्ह करण्यास मदत करतं. यासंबंधी कस्परस्की अॅंटीव्हायरसने माहिती देताच गूगलने हे अॅप आता प्ले स्टोअरवरून काढून टाकले आहे!

याआधी कमी डाउनलोड्स असलेल्या अॅप्सबाबत असे प्रकार घडायचे. मात्र आता कोट्यवधी डाउनलोड्स असलेल्या अॅप्सबाबत असे प्रकार उघडकीस येणं नक्कीच धक्कादायक आहे. कॅमस्कॅनरमध्ये सापडलेला मॅलवेअर हा Trojan Dropper प्रकारचा असून हे मोडयूल (Trojan-Dropper.AndroidOS.Necro.n) अॅपसोबत डाउनलोड होतं. इंस्टॉल झाल्यावर हे स्वतःला extract करून दुसरं मोडयूल फोनमध्ये समाविष्ट करतं आणि त्याद्वारे आपल्याला न सांगता अॅप्स इंस्टॉल होऊ लागतात किंवा विविध जाहिराती दिसणं सुरू होतं. कॅमस्कॅनर नेहमीच अशा स्वरूपाचं अॅप नव्हतं मात्र अलीकडे आलेल्या अपडेटमधून हा मॅलवेअर घुसवण्याचा प्रयत्न झाल्याच दिसून येत आहे.

कॅमस्कॅनर अॅप जर वापरत असाल तर Uninstall करून टाका आणि खाली दिलेल्या अॅप्सपैकी कोणतेही अॅप वापरू शकता.

Camscanner या अॅपसाठी पर्याय

यापूर्वी क्लिनमास्टर बाबतसुद्धा असा प्रकार घडला आहे. CleanMaster, CM फाईल मॅनेजर, किका किबोर्ड CM लाँचर, CM लॉकर असे अॅप्स डेव्हलप करणार्‍या चिता मोबाइल व किका टेक यांच्यावर गूगल प्ले स्टोअरने जाहिरातींचा गैरव्यवहार करून क्लिक्समध्ये वाढ करून वापरकर्त्याच्या परवानगीशिवाय कृती केल्याने कारवाई केली होती.  

Exit mobile version