एयरटेलने जिओसोबत स्पर्धेमध्ये मागे पडल्यावर आता ग्राहकांना वळवण्यासाठी नवनवे प्लॅन्स आणायला सुरुवात केली आहे. जिओ सोडली तर सध्या एयरटेलचेच प्लॅन्स ग्राहकांसाठी आकर्षक आहेत. प्लॅन्ससोबत मिळणाऱ्या इतर सेवा सुद्धा एयरटेलतर्फे अलीकडे वाढवण्यात आल्या आहेत. आता एयरटेल त्यांच्या ठराविक प्लॅन्ससोबत दररोज 400MB डेटा मोफत देणार आहे. आधी सुद्धा काही प्लॅन्सना 400MB अतिरिक्त डेटा दिला जात होता मात्र आता ग्राहकांचा या गोष्टीला जास्त प्रतिसाद मिळत असलेला पाहून एयरटेलने हा मोफत डेटा आणखी प्लॅन्ससोबत देण्याचा निर्णय घेतला आहे.
आजवर 400MB अतिरिक्त मोफत डेटा 399, 448 व 499 च्या प्लॅन्सवर मिळायचा. तो आता 509 आणि 558 च्या प्लॅन्सवर सुद्धा मिळणार आहे. तसेच 499 च्या प्लॅनवर 250MB अतिरिक्त डेटा मिळणार आहे.
उदाहरणार्थ 558 च्या प्लॅनवर तुम्हाला रोज 3GB डेटा ८२ दिवसांच्या वैधतेवर मिळतो. सोबत Wynk Music, Norton Antivirus, Airtel Xstream प्रीमियम आणि 4G डिव्हाईस कॅशबॅक तर आता या नव्या ऑफर अंतर्गत जर तुम्ही एयरटेल थॅंक्स (Airtel Thanks)अॅपद्वारे रीचार्ज केला तर या सगळ्यासोबत 400MB अतिरिक्त डेटा मिळेल. (म्हणजे थोडक्यात रोज 3.4GB डेटा) जो ८२ दिवसांसाठी 32GB मोफत अतिरिक्त इंटरनेट डेटा होईल! या 400MB डेटासाठी रीचार्ज या Airtel Thanks द्वारेच करावा लागेल हे मात्र लक्षात घ्या
अनेकांना ठाऊक नसेल पण जिओ टीव्ही प्रमाणेच एयरटेलसुद्धा त्यांच्या ग्राहकांना मोफत टीव्ही मालिका, लाईव्ह टीव्ही, चित्रपट पाहण्याची सोय देतं. Airtel TV ज्याचं नाव आता Xstream असणार आहे त्यामध्ये Zee5, HOOQ, Eros Now, ALT Balaji यांचे व्हिडिओ मोफत पाहता येतात! यासाठी तुम्हाला ज्या प्लॅन्ससोबत या सोयी देण्यात आल्या आहेत त्या प्लॅन्सनी रीचार्ज करावा लागेल.
एयरटेल प्रिपेड प्लॅन्सबद्दल अधिक माहिती : https://www.airtel.in/recharge-online