Sigma fp : जगातला सर्वात लहान फुलफ्रेम मिररलेस कॅमेरा!

सिग्मा या कॅमेरा लेन्ससाठी प्रसिद्ध असलेल्या कंपनीने त्यांचा स्वतःचा फुलफ्रेम मिररलेस कॅमेरा सादर केला असून हा आजवरचा सर्वात लहान आकाराचा फुलफ्रेम कॅमेरा असेल! यामध्ये 24.6MP Full Frame Bayer Sensor देण्यात आलेला आहे. या कॅमेराचं वजन केवळ ३७० ग्रॅम्स आहे! सिग्मा या कॅमेराला पॉकेटेबल फुल फ्रेम कॅमेरा असं म्हणत आहे. याचा आकार बऱ्याच APSC सेन्सर असलेल्या कॅमेरासोबत साधर्म्य साधतो! DSLR कॅमेराना बाजूला सारत मिररलेस कॅमेराच्या वाढत्या स्पर्धेत आता सिग्मानेही उडी घेतली आहे.

Sigma fp mirrorless camera

Sigma fp या कॅमेरामध्ये 3.2-inch 2.1M-dot टचस्क्रीन डिस्प्ले, SD card slot, HDMI port, flash sync port, mic व headphone ports, USB 3.1 port आणि remote shutter port चा समावेश आहे. हा कॅमेरा 14-bit DNG RAW फाइल्स 18 frames per second वेगाने १२ फ्रेम्स शूट करू शकेल. 12-bit CinemaDNG RAW व्हिडिओ 4K/24p रेजोल्यूशनवर रेकॉर्ड करेल. याची ISO range 100-25600 अशी आहे. यामध्ये 49-point contrast detect focus system असून Face आणि Eye-Detect सपोर्ट देण्यात आलेला आहे. या कॅमेराची किंमत जाहीर करण्यात आलेली नाही मात्र $800 ते $1200 दरम्यान असेल असं सांगण्यात येत आहे.

Sigma fp अधिकृत माहिती : sigmaphoto.com/article/sigma-fp-press-release

Exit mobile version