आज म्हणजे १२ जुलैपासून आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल रुखमाई मंदिराचं जगभरातून कोणत्याही जागेवरून लाईव्ह दर्शन घेता येणार आहे! जिओ टीव्ही ही सेवा रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी मोफत उपलब्ध असून याद्वारे चित्रपट, मालिका, टीव्ही चॅनल्स लाईव्ह पाहता येतात. या नव्या तंत्रज्ञानाचा लाभ घेत कोणत्याही वेळी भाविकांना विठ्ठलाचं लाईव्ह दर्शन त्यांच्या फोन्सद्वारे सहज घेता येईल!
जिओ टीव्हीद्वारे श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शन लाईव्ह कसे पाहायचे ?
- प्रथम तुमच्या फोनमध्ये जिओचं सिमकार्ड असायला हवं
- त्यानंतर फोनमध्ये प्ले स्टोअरवरून Jio TV अॅप डाउनलोड करून घ्या
लिंक : JioTV on Google Play - आता तुम्हाला मधल्या भागात उजवीकडे Categories व Languages असे दोन पर्याय दिसतील
- त्यामध्ये Categories अंतर्गत Devotional निवडा आणि Languages अंतर्गत मराठी निवडा
- आता यामध्ये तिसरा पर्याय श्री विठ्ठल रुक्मिणी लाईव्ह दर्शन असा दिसेल त्यावर टॅप करा
- आता तुमच्यासाठी विठ्ठल रुक्मिणी लाईव्ह दर्शन सुरू झालेलं दिसेल..!
यासंबंधीची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी जाहीर केली आहे. आषाढीसह इतर दिवशीसुद्धा ही लाईव्ह स्ट्रिम सुरूच राहणार असल्यामुळे कायम ऑनलाइन दर्शन उपलब्ध असणार आहे.
जिओ टीव्ही व टाटा स्काय यांच्यासोबत झालेल्या करारामुळे मंदिर समितीला येत्या तीन वर्षात १.२५ कोटींचं उत्पन्न मिळणार आहे. भाविकांना घरबसल्या हे दर्शन आधी टाटा स्कायद्वारे टीव्हीवर २४ तास स्वतंत्र भक्ती वाहिनीद्वारे आणि आता जिओ टीव्हीद्वारे फोन्सवर सुद्धा कधीही उपलब्ध झालेलं आहे!
JioTV Download Links : https://jiotv.com
Search Terms : shri vitthal rukmini darshan pandharpur live
खास आषाढी एकादशीनिमित्त आम्ही ही पोस्ट केली असून खाली दिलेल्या शेयर बटनांचा वापर करून हा लेख शेयर करायला विसरू नका.