PUBG Mobile Lite भारतात उपलब्ध : 2GB रॅम फोन्सवरही चालेल!

PUBG Mobile Lite Poster

प्लेयर अननोनज् बॅटलग्राउंड किंवा पब्जी (PUBG) ही गेम अजूनही सर्वात लोकप्रिय मोबाइल गेम आहे. पीसी, कॉन्सोलपेक्षा मोबाइल आवृत्तीच भारतात अधिक प्रसिद्ध झाली आहे. अधूनमधून या गेमच्या अतिवापरामुळे घडणाऱ्या घटना ऐकायला मिळत असतात पण त्यामुळे गेम खेळणाऱ्यांचं प्रमाण कमी झालेलं नाही. सध्या या गेमला बऱ्यापैकी चांगलं हार्डवेअर असलेला फोन असावा लागतो नाहीतर फोन स्लो होणे, हॅंग होणे, गरम होणे असे प्रकार घडतात. मोबाइल फोन विक्रेते तर अलीकडे या फोनमध्ये पब्जी चांगली चालते हाच फोन घ्या अशा शब्दात फोन्सची विक्री करत आहेत. मात्र आता ही गेम कमी क्षमतेच्या फोन्सवरसुद्धा खेळता येणार असून त्यासाठी PUBG Mobile Lite ही गेम सादर करण्यात आली आहे!

भारतात अनेकांकडे मध्यम वा कमी क्षमतेच्या स्मार्टफोन्सचं प्रमाण जास्त आहे. आता त्यांनाही या गेमचा आनंद घेता यावा आणि आणखी यूजर्सना या गेमकडे वळवता यावं म्हणून टेनसेंट गेमिंग आणि पब्जी कॉर्प यांनी ही नवी पब्जी मोबाइल गेम आता भारतात उपलब्ध करून दिली आहे. ही गेम 2GB रॅम असलेल्या फोन्सवरही चालू शकेल. याची इंस्टॉल साईज 400MB आहे. कमी क्षमतेच्या फोन्ससाठी असल्यामुळे याचा मॅपसुद्धा लहान आहे आणि याच्या मॅचमध्ये ६० प्लेयर्स सोबतच गेम खेळता येईल. (पब्जी मोबाइलमध्ये १०० प्लेयर्ससोबत मॅच असते). मॅप लहान असल्यामुळे गेमप्लेचा वेळ सुद्धा कमी असून जवळपास १० मिनिटात याची एक गेम संपेल!

Download PUBG Mobile Lite on Google Play

PUBG Mobile Lite मधील काही सुविधा

Exit mobile version