आता इंस्टाग्राम स्टोरीमधूनच ग्रुप चॅट सुरू करा! : नव्या स्टिकरचा समावेश

Instagram Stories Sticker Group Chat

इंस्टाग्रामने आता नवं स्टिकर आणलं असून याद्वारे आपल्याला एखाद्या ठराविक स्टोरीवर चर्चा करण्यासाठी ग्रुप चॅट सुरू करता येईल ! हा बदल इंस्टाग्रामतर्फे आज ट्विटरवर जाहीर करण्यात आला असून यूजर्सना Join Chat स्टिकरचा पर्याय नव्याने देण्यात येणार आहे. फॉलोअर्सपैकी स्टोरी पाहणाऱ्याने जर त्या स्टिकरवर टॅप केलं तर त्यांना एका प्रायव्हेट चॅटमध्ये अॅड केलं जाईल. अर्थात मूळ स्टोरी जोडणाऱ्याना त्यावर नियंत्रण देण्यात आलेलं आहेच.

इंस्टाग्राम हा नवा Join Chat स्टिकर पर्याय मित्रांसोबत जोडलं जाण्यासाठी आणखी एक पर्याय म्हणून समोर आणू पाहत आहे. अलीकडे त्यादृष्टीने त्यांचे स्टिकर, स्टोरीमधील बदल दिसून येत आहेत. लवकरच सर्वत्र येणाऱ्या शॉप पर्यायाद्वारेही आणखी काही बदल पाहायला मिळू शकतील.

ADVERTISEMENT
Exit mobile version