हॉटस्टारचा जागतिक विक्रम : एकाचवेळी तब्बल २.५३ कोटी लोकांनी पाहिला सामना!

Hotstar Streaming Record

भारतातली आघाडीची स्ट्रिमिंग कंपनी हॉटस्टारने सोमवारी अशी माहिती जाहीर केली आहे की क्रिकेट वर्ल्ड कप २०१९ च्या इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्या अंतिम सामन्यावेळी एकाक्षणी तब्बल २.३५ कोटी लोक एकाचवेळी त्यांच्या प्लॅटफॉर्मवर सामना स्ट्रिम करत पाहत होते! यापूर्वीसुद्धा हॉटस्टारचाच विक्रम होता जो आयपीएल २०१९ च्या अंतिम सामन्यावेळी झाला होता. त्यावेळीसुद्धा १.८६ कोटी लोकानी एकावेळी हॉटस्टार वापरलं होतं!

यासोबतच या संपूर्ण ICC Cricket World Cup 2019 दरम्यान अनेक सामन्यावेळीही जवळपास १.५ कोटी लोक हॉटस्टारद्वारे क्रिकेटचा आनंद घेत होते अशी माहिती देण्यात आली आहे!

ADVERTISEMENT
Exit mobile version