सॅमसंग गॅलक्सी M40 स्मार्टफोन सादर!

सॅमसंगने मध्यम किंमतीच्या फोन्सच्या बाजारात पुन्हा एकदा बस्तान बसवायला सुरुवात केल्याच चित्र दिसत असून आता यासाठीच त्यांनी आणखी एक नवा पर्याय उपलब्ध करून दिला असून नवा फोन त्यांच्या सध्या गाजत असलेल्या M सिरिज फोनमध्ये सादर झाला आहे. Samsung Galaxy M40 हा फोन 6GB रॅम व 128GB स्टोरेजसह १९९९० रुपयांना भारतात अॅमेझॉनवर उपलब्ध होत आहे.

या नव्या फोनमध्ये 6.3″ FHD डिस्प्ले दिलेला असून याला सॅमसंगने इन्फिनिटी ओ असं नाव दिलं आहे. डिस्प्लेमध्येच फ्रंट कॅमेरा दिलेला आहे. क्वालकॉमचा Snapdragon 675 प्रोसेसर यामध्ये बसवलेला असून 6GB रॅम व 128GB स्टोरेज देण्यात आलं आहे. फोनच्या मागे तीन कॅमेरे असून मुख्य कॅमेरा 32MP, सोबत 5MP लाईव्ह फोकस व 8MP अल्ट्रा वाईड सेन्सर आहे! सेल्फीसाठी फ्रंट कॅमेरा 16MP असेल. 3500mAh ची बॅटरी देण्यात आली असून याला 15W Type C चार्जरद्वारे फास्ट चार्ज सपोर्ट देण्यात आला आहे. ऑपरेटिंग सिस्टम अँड्रॉइड 9.0 पाय आधारित असेल.

Samsung Galaxy M40 Specs :
डिस्प्ले : 6.3″ FHD+ Display, Corning Gorilla Glass, 2340×1080 pixels
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 675
रॅम : 6GB
स्टोरेज : 128GB + Expandable upto 512GB
कॅमेरा : 32MP f/1.7 + 5MP Live Focus Lens + 8MP Wide Angle Lens
फ्रंट कॅमेरा : 16MP f/2.0
बॅटरी : 3500mAh with 15W Type C Charge with fast charging
ऑपरेटिंग सिस्टिम : Android 9 Pie
सेन्सर्स : Fingerprint Scanner, Accelerometer, Gyroscope, Proximity, Geomagnetic, Virtual Light Sensing
रंग : Midnight Black, Seawater Blue
किंमत : भारतात १८ जून पासून अॅमेझॉनवर उपलब्ध
₹१९९९० (6GB+128GB)

Exit mobile version