आता डिस्प्लेखालीच फ्रंट कॅमेरा : ओप्पो, शायोमीचं नवं तंत्रज्ञान!

गेले काही महीने सुरू असलेला स्मार्टफोन्सवर अधिक मोठा डिस्प्ले देण्याचा प्रयत्न रोज नवनवीन नॉच व मेकॅनिकल पार्ट्स वापरुन बनवलेली डिझाईन्स आपल्या समोर आणत आहे. सर्वच कंपन्या यामध्ये वेगळा प्रयत्न करत पूर्ण डिस्प्ले देऊन सेल्फी/फ्रंट कॅमेरासाठी नवी जागा शोधताना पाहायला मिळत आहे. काहींनी नॉचरूपात याची सुरुवात केली मग तो नॉच लहान करण्याच्या प्रयत्नात वॉटरड्रॉप नॉच पर्यंत डिझाईन्स आली त्यानंतर पूर्ण डिस्प्ले देत कॅमेरासाठी मेकॅनिकल पार्ट्स वापरुन फ्रंट कॅमेरासाठी टॅप करताच फोनमधून वर येणारे कॅमेरा पाहायला मिळाले! या सर्व तंत्रज्ञानामध्ये विवो, ओप्पो, शायोमी या चीनी कंपन्यांनीच आघाडी घेतलेली पाहायला मिळत असून आता नव्या प्रयत्नांनुसार फ्रंट कॅमेरा डिस्प्लेखालीच बसवण्यात ओप्पो व शायोमी यशस्वी झाले आहेत!

या नव्या तंत्रज्ञानामुळे काही फोन्समध्ये असलेल्या डिस्प्ले खालील फिंगरप्रिंट स्कॅनर प्रमाणे फ्रंट सेल्फी कॅमेरासुद्धा डिस्प्ले खालीच पाहायला मिळेल! आज ओप्पोने सर्वात आधी याबद्दलचा व्हिडिओ चीनी सोशल मीडिया साईटवर प्रसिद्ध केला त्यानंतर काही क्षणातच शायोमीच्या अधिकार्‍यांनीही त्यांच्या प्रोटोटाइपचा व्हिडिओ टाकला! हे दोन्ही व्हिडिओ खाली जोडलेल्या ट्विट्समध्ये पाहू शकता…

ओप्पोचे उपप्रमुख ब्रायन शेन यांनी यावेळी माध्यमांना सांगताना अशी माहिती दिली की हे तंत्रज्ञान सध्याच्या डिस्प्ले बाहेर असणार्‍या फ्रंट कॅमेराच्या गुणवत्तेची बरोबरी करणारं नसलं तरी यामध्ये भविष्यात ती गुणवत्ता साधण्याची क्षमता नक्कीच आहे!

Search Terms : Oppo and Xiaomi bring their latest innovation of under display frant selfie camera technology prototypes!

Exit mobile version