होय तुम्ही बरोबर वाचत आहात. तंत्रज्ञान विश्वात आघाडीवर असणारी मायक्रोसॉफ्ट कंपनी सादर करत आहे बॉडी प्रॉडक्टस! आजवर हार्डवेअर, सॉफ्टवेअर सोडून गेमिंग उत्पादने म्हटलं की टी शर्ट, गेमिंग खुर्ची, फर्निचर, शीतपेय इत्यादि गोष्टी उपलब्ध होत्या. आता मायक्रोसॉफ्टने या सगळ्याच्या पुढे जात चक्क गेमिंग पर्सनल केयर प्रॉडक्टस बाजारात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे!
एक्सबॉक्स या मायक्रोसॉफ्टच्या प्रसिद्ध गेमिंग कॉन्सोलद्वारे त्यांनी गेमिंग विश्वात स्वतःचं स्थान निर्माण केलेलं आहे. आता त्यावर एक्सबॉक्स ब्रॅंडेड उत्पादने आणली जाणार असून यासाठी त्यांनी अॅक्स बॉडी स्प्रे यांच्यासोबत भागीदारी केली आहे! याद्वारे ते बॉडी वॉश, शॉवर जेल आणि डिओड्रंट उपलब्ध करून देतील.
तूर्तास ही उत्पादने ऑस्ट्रेलियामध्ये जुलै महिन्यात उपलब्ध होणार आहेत. अॅक्सची मालकी असलेल्या यूनिलिव्हरच्या Lynx ब्रॅंड अंतर्गत उपलब्ध केली जातील. आम्ही एक्सबॉक्स युजर्सना रोज अविश्वसनीय गोष्टी करताना पाहतो आणि त्यांचं ते कौशल्य साजरं करण्यासाठी आम्ही काहीतरी खास करण्याच्या दृष्टीने ही उत्पादने सादर केली असल्याच तानिया ची (एक्सबॉक्स बिझनेस प्रमुख) यांनी सांगितलं. Lynx Xbox चा सुवास फळे, औषधी, लाकडांचे विविध प्रकार यांच्यावर आधारित असेल अशी माहितीही यावेळी देण्यात आली!
यावेळी E3 (Electronic Entertainment Expo) या गेमिंग क्षेत्रातल्या सर्वात मोठ्या कार्यक्रमातही अशीच विचित्र उत्पादने पाहायला मिळाल्यास आश्चर्य वाटून घेऊ नका. E3 यंदा Los Angeles येथे ११ ते १४ जून दरम्यान पार पडेल!
Search Terms : Microsoft is launching Xbox body wash to be produced in partnership with Axe body spray