गार्मीन या फिटनेस संबंधित उपकरणे बनवणाऱ्या कंपनीने त्यांचं नवं स्मार्ट घड्याळ काल भारतात उपलब्ध केलं असून Garmin Forerunner 945 मध्ये विविध स्पोर्ट्स पर्याय देण्यात आले आहेत. यामध्ये १००० गाणीसुद्धा साठवता येतात! जलतरण, सायकलिंग, रनिंग, इ सर्व प्रकारच्या स्पोर्ट्स ऍक्टिव्हीटीमध्ये याचा वापर करता येईल.
यामध्ये सुरक्षा आणि ट्रॅकिंग संबंधित सोयी सुद्धा देण्यात आल्या आहेत. हे घड्याळ काळा व निळा या दोन रंगामध्ये उपलब्ध होत असून याची किंमत ५९९९० अशी असणार आहे. हे घड्याळ अमेझॉन, मिंत्रा, पेटीएम मॉल या वेबसाइट्सवर उपलब्ध झालं आहे.
Garmin Forerunner 945 सुविधा
- यामध्ये स्पॉटीफाय सारख्या सेवांद्वारे गाणी Sync करता येतील किंवा यामधील स्टोरेज वापरून १००० गाणी साठवता येतील.
- Garmin Pay द्वारे पेमेंट्स करता येतील!
- रंगीत मॅप्स रनिंग वेळेस अधिक सुलभ मार्गदर्शन करतील.
- यामधील सुरक्षा आणि ट्रॅकिंग सुविधा इमर्जन्सीवेळी आपल्या कॉन्टॅक्टना माहिती देईल!
- २ आठवड्यांची बॅटरी लाईफ, GPS + म्युझिक मोड मध्ये दहा तास!
हे वॉच स्पोर्ट्स साठीच चांगलं असेल कारण याच्यापेक्षा कमी किंमतीत अॅपल वॉच सिरीज ४ चांगला पर्याय ठरेल. गेल्या काही दिवसांपूर्वीच Garmin Forerunner 245 व Forerunner 245 Music भारतात सादर झाले आहेत. यांच्या किंमती अनुक्रमे २९९९० आणि ३४९९० अशा आहेत.