DJI Robomaster S1 : डीजेआयचा स्मार्ट शैक्षणिक रोबॉट!

ड्रोन्सच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध असणार्‍या डीजेआय कंपनीने आता खास विद्यार्थ्यांसाठी रोबोमास्टर एस१ नावाचा रोबॉट सादर केला असून हा रोबॉट त्यांना खेळण्यासोबत सोबत कोडिंग शिकण्याची संधी देतो. फोनने नियंत्रित करता येणार्‍या या रोबॉटमध्ये विविध प्रकारे कल्पना लढवून विद्यार्थी कोड वापरुन स्वतःच्या इच्छेप्रमाणे मार्ग दाखवून कृती करवून घेऊ शकतात! याची किंमत $499 (~₹३५,०००) इतकी असेल आणि हा अमेरिका, चीन व जपान या देशांमध्ये उपलब्ध होत आहे.

Robomaster S1 मध्ये वापरले जाणारे सुटे भाग

या Robomaster S1 मध्ये कॅमेरा, ३१ सेन्सर्स, सॉफ्टवेअर, उत्तम हार्डवेअर आणि एक छोटीशी तोफ देण्यात आली आहे जी छोट्या जेल बुलेट्स सोडू शकते! यामधील कॅमेरा व सेन्सर्सचा वापर करून हा रोबॉट हावभाव व आवाजाला प्रतिसाद देऊ शकतो व वस्तु/मार्ग ट्रॅक करू शकतो! हे सर्व कशा प्रकारे चालतं हे पाहण्यासाठी खालील व्हिडिओ नक्की पहा…

DJI Robomaster S2 बद्दल अधिकृत माहिती : https://www.dji.com/robomaster-s1

Search Terms : DJI Robomaster S1 Smart Educational Robot that tracks objects and responds to gestures and sounds!

Exit mobile version