माइनक्राफ्ट या प्रसिद्ध गेमला नुकतीच दहा वर्षं पूर्ण झाली आहेत. आजपर्यंत पीसीवर सर्वाधिक विक्री झालेली ही गेम आता AR ( ऑग्मेंटेड रिअॅलिटी) च्या रूपात उपलब्ध होत असून या नव्या गेमची घोषणा नुकतीच करण्यात आली. माइनक्राफ्ट अर्थ असं या नव्या गेमचं नाव असेल आणि ही गेम अँड्रॉइड व iOS वर मोफत उपलब्ध होईल. तूर्तास खालील वेबसाइटवर साईन अप कराव लागेल.
माइनक्राफ्ट अर्थ लिंक : https://www.minecraft.net/en-us/earth
माइनक्राफ्ट अर्थ अनेकांच्या पसंतीस उतरेल कारण या गेमचं स्वरूपच तसं आहे. अनेक उपलब्ध ब्लॉक्समधून आपल्याला हव्या त्या प्रकारे आपण माइनक्राफ्ट शहर तयार करू शकतो! यामध्ये काही खास गुणवत्ता असलेल्या ब्लॉक्समुळे तर अमर्याद शक्यता निर्माण करता येतात. आपली कल्पनाशक्ती वापरुन हव्या तशा इमारती बनवा, त्यामध्ये कार्टद्वारे फिरण्याची सोय करा, बाण/तलवारी वापरुन गेममधील शत्रूंसोबत लढा असं अगदी काहीही करता येईल! याचा पूर्ण फोकस AR वर असल्यामुळे आणखी मजा येईल हे नक्की…
काही महिन्यांपूर्वी आलेली पोकेमॉन गो सुद्धा एक AR आधारित गेम होती. AR आधारित गेम्स आपल्याला फोनच्या कॅमेराद्वारे खरं वास्तविक आयुष्य दाखवत त्याला डिजिटल ऑब्जेक्ट्स/वस्तूंची जोड देतात. यामुळे आपल्या आजूबाजूला त्या वस्तु प्रत्यक्षात असल्याच आपल्या फोनमध्ये पाहायला मिळतं!
AR Augmented Reality म्हणजे आभासी आणि वास्तविक जग दोन्हीचा एकाच वेळी वापर करता येतो. व्हर्च्युअल रिअॅलिटी (VR) मध्ये फक्त आभासी जगच पाहता येतं. ऑग्मेंटेड रिअॅलिटीमध्ये मात्र आभासी जगातील वस्तू वास्तविक जगात दिसतात (कॅमेरा/डिस्प्ले/हेडसेटद्वारे). येत्या काळात आपल्या आजूबाजूला AR चा बर्याच गोष्टींसाठी वापर केला जाण्याची शक्यता आहे