अॅपलने काल त्यांच्या आयपॉडची सुधारित आवृत्ती सादर केली असून यामध्ये A10 फ्युजन चीप जोडण्यात आली आहे. या नव्या चीपमुळे याची कामगिरी सुधारणार असून गेमिंगसाठी सुद्धा वापरता येईल! सोबत फेसटाइमद्वारे ग्रुप कॉल्स करता येतील!
आयपॉड प्रामुख्याने गाणी, संगीत ऐकण्यासाठी बनवण्यात आला होता. पुढे कालांतराने त्यामध्ये अनेक सुविधा जोडल्या गेल्या व नंतर या सोयी स्मार्टफोन्समध्ये उपलब्ध झाल्याने आयपॉडची फारशी गरज उरली नाही. त्यामुळे अॅपलसुद्धा त्यांच्या या एकेकाळी गाजलेल्या उत्पादनाला अपडेट देत नाही. आता नव्याने आलेला हा आयपॉड तब्बल चार वर्षांनी आला आहे. मात्र आताही प्रश्न उरतोच की फोन्स सोडून हे प्रॉडक्ट घेण्यामध्ये कोणाला स्वारस्य असेल…!
२०१९ मध्ये उपलब्ध होत असलेल्या या आयपॉडची कामगिरी आधीच्या मॉडेल्सपेक्षा दुपटीने सुधारण्यात आली असून ग्रुप फेसटाइम व AR ( ऑग्मेंटेड रिअॅलिटी) देणारं सर्वात स्वस्त iOS डिव्हाईस आहे असं अॅपलच्या उपाध्यक्षांनी यावेळी सांगितलं. यामध्ये अॅपल म्युझिक किंवा आयट्यून्सद्वारे संगीत ऐकण सहज सोपं आहे! अधिक स्टोरेजमुळे ऑफलाइन अनुभवही अधिक चांगला असेल! गेमिंगसाठी लवकरच येणार्या अॅपल आर्केड सेवेचाही वापर यामध्ये करता येईल!
या नव्या iPod Touch ची किंमत ₹१८९०० (32GB) पासून सुरू होते. इतर मॉडेल्सची किंमत ₹२८९०० (128GB) आणि ₹३८९०० (256GB) अशी आहे.
Search Terms Apple announces updated iPod touch with A10 fusion chip and more storage