सेल्फीला कवितेनं सजवणारा गूगलचा पोएमपोर्ट्रेट आर्ट प्रोजेक्ट!

गूगलच्या आर्ट्स अँड कल्चर एक्सपरिमेंट्स अंतर्गत बर्‍याच भन्नाट गोष्टी उपलब्ध करून दिल्या जात असतात. यामध्ये आता नव्याने जोडण्यात आलेला पोएमपोर्ट्रेट (PoemProtrait) प्रोजेक्ट तुम्ही दिलेल्या शब्दाचा वापर असलेली कविता AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) द्वारे शोधून/तयार करून ती तुमच्या सेल्फीवर एखाद्या फिल्टरप्रमाणे लावून देईल!

PoemPotrait लिंक : artsexperiments.withgoogle.com/poemportraits

तुमची पोएमपोर्ट्रेट कशी तयार करायची ?
1. वर दिलेल्या लिंकवर जा आणि Begin वर टॅप करा
2. त्यानंतर तुम्हाला तुमच्या आवडीचा किंवा जोडायचा असलेला शब्द टाकून donate वर टॅप करायचं आहे ( हा शब्द वापरुन AI कविता तयार करेल!)
3. त्यानंतर गूगल कॅमेराबद्दलची परवानगी मागेल त्याद्वारे तुम्ही सेल्फी काढू शकाल
4. आणि हे करताच तुमच्या सेल्फीवर तुम्ही निवडलेल्या शब्दापासून तयार केलेली कविता दिसेल!

ADVERTISEMENT

Search Terms : Google’s Art and Culture Experiment brings PoemPortraits that will create poem overlay effect on your selfie

Exit mobile version