गूगल ड्युओ या गूगलच्या व्हिडिओ चॅट अॅपमध्ये आता एकाचवेळी आठ लोकांसोबत व्हिडिओ कॉल करता येणार आहे! तुलना करावयाची झाल्यास अॅपल फेसटाइमवर ३२, व्हॉट्सअॅपवर ४, स्काईपवर ५०, फेसबुक मेसेंजरवर ५० लोकांशी एकाच वेळेस व्हिडिओद्वारे संभाषण करता येतं! गूगल ड्युओची ही नवी सोय अँड्रॉइड व iOS दोन्हीसाठी आता उपलब्ध झालेली आहे.
Google Duo : https://duo.google.com/
गूगलने ही ग्रुप कॉलिंग सेवा तूर्तास फोन्सपुरतीच मर्यादित ठेवली आहे. गूगल ड्युओच्या वेबसाइटद्वारे ब्राऊजरवरून ग्रुप कॉल्स करता येणार नाहीत. त्यासाठी त्यांचीच हॅंगआऊट्स नावाची सुविधा वापरता येईल.
या ग्रुप कॉल्सच्या सुविधेबरोबर गूगलने Duo मध्ये नवा डेटा सेव्हिंग मोड जोडला आहे. हा भारत, इंडोनेशिया, ब्राझिल या देशांमध्येच उपलब्ध असेल. भारतामध्ये ही सेवा बर्यापैकी लोकप्रिय झाली असून गूगलने आपल्या मित्रांना Duo वर आणल्याबद्दल काही रिवार्ड्ससुद्धा देऊ केले आहेत! (Refer & Earn). यासोबत ज्यावेळी समोरची व्यक्ती व्हिडिओ कॉल उचलत नाही त्यावेळी व्हिडिओ मेसेजेस पाठवता येतील. नव्या अपडेटमध्ये हे व्हिडिओ मेसेज कस्टमाईझ करता येतील. त्यांच्या चित्र काढता येईल, शब्द व इमोजीसुद्धा लिहिता येतील!
Search Terms Google Duo now allows group video calls with upto 8 people