टेक कंपन्यांचं एप्रिल फूल : गूगलचा स्क्रीन क्लीनर, वनप्लसची कार…!

आज आहे एप्रिल फुल्स डे… आजच्या दिवशी बरेच जण एकमेकांना मूर्ख बनवण्यासाठी भन्नाट कल्पना शोधत असतात. तंत्रज्ञान क्षेत्रात असणार्‍या मोठ्या कंपन्याही याला अपवाद नाहीत. दरवर्षी प्रमाणे यावेळीही वेगवेगळ्या कल्पना लढवून विचित्र उत्पादन आणत असल्याच जाहीर केलं जातं. तर आजच्या लेखामध्ये पाहूया कोणत्या कंपनीने २०१९ एप्रिल फुल्स डे साठी कोणतं उत्पादन आणलं आहे…!

खाली उल्लेख केलेली सर्व उत्पादने काल्पनिक असून एप्रिल फुल्स डे च्या निमित्ताने सादर करण्यात आली आहेत आहेत याची वाचकांनी नोंद घ्यावी…

गूगल : गूगल स्क्रीन क्लिनर इन फाइल्स अॅप : हे अॅप आता फोनमधील गरज नसलेल्या फाइल्स सोबत फोनच्या स्क्रीनवरील धूळ, डाग स्वच्छ करेल! http://g.co/getfiles


Google Maps Snake : गूगल मॅप्समध्ये स्नेक गेम खेळण्याची सोय! : जगभरातील विविध ठिकाणं गूगल मॅप्सवर जोडत हा स्नेक गेम खेळता येईल! आज गूगल मॅप्स अॅपच्या सर्चबारच्या डाव्या बाजूला लाल ठिपका दिसेल. त्यावर टॅप करून Play Snake वर करा.https://goo.gl/VTaeWG

Google Tulip : गूगल ट्यूलिप : AI चा वापर करून गूगल असिस्टंट Tulipish भाषा बोलेल! https://youtu.be/nsPQvZm_rgM

Roku Press Paws Remote : रोकू कंपनीने त्यांच्या स्ट्रिमिंग स्टिकच्या रिमोटसाठी नवा पर्याय दिला असून प्राण्यांसाठीही हा वापरण सोपं असेल कारण यामध्ये त्यांच्या पंज्याच्या आकाराची बटणे जोडलेली असतील! सोबत बार्क असिस्टंट असेल!

OnePlus Warp Car : वनप्लसची कार : या कारमध्ये वनप्लसच्या वार्प चार्ज तंत्रज्ञानाचा वापर केलेला असेल ज्यामुळे २० मिनिटांच्या चार्जवर चार पूर्ण दिवस चालेल! 0-60 mph ३ सेकंदात गाठण्याची क्षमता! https://youtu.be/QG6Bs1nXpiE

Shuttestock Physical Library : शटरस्टॉक या प्रसिद्ध स्टॉक इमेजेस पुरवणार्‍या वेबसाइटने आता ऑफलाइन ग्रंथालय दुकान सुरू करण्याचं ठरवलं असून सर्व इमेजेस ऑफलाइन पाहता खरेदी करता येतील! https://youtu.be/M7bUF0qyMVE

OLA Restrooms : ओला रेस्टरूम्स : भारतीय कॅब कंपनी ओलानेही नवं उत्पादन आणलं असून कॅबप्रमाणे आपल्याला प्रसाधनगृहसुद्धा अॅपद्वारे बोलवता येईल!

Search Terms : April Fool’s Day being celebrated by Tech Companies

Exit mobile version