रेडमी Y3, रेडमी ७ स्मार्टफोन्स सादर : 32MP सुपर सेल्फी कॅमेरा!

शायोमीच्या प्रसिद्ध रेडमी ब्रॅंड अंतर्गत नवे फोन्स Redmi Y3 व Redmi 7 आज भारतात सादर झाले असून मोठा डिस्प्ले, 32MP फ्रंट सुपर सेल्फी कॅमेरा, अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. AI चा फोटोग्राफीसाठी वापर करण्यात आल्याची माहिती शायोमीने दिली आहे. रेडमी Y3
३० एप्रिलपासून पासून सेलद्वारे mi.com, अॅमेझॉनवर उपलब्ध होईल तर रेडमी ७ २९ एप्रिल पासून अॅमेझॉन व mi.com वर मिळेल.

स्वस्त किंमतीच्या फोन्समध्ये हा नवा पर्याय आला असून याला ग्राहकांचा नेहमीप्रमाणे मोठा प्रतिसाद लाभण्याचा अंदाज आहे. सध्या शायोमीला विवो, ओप्पो, एसुस, हुवावे यांचीही जोरात लढत मिळत आहे! या फोन्ससोबत Mi LED Smart Bulb हा फोनद्वारे नियंत्रित करता येणारा बल्ब सुद्धा सादर करण्यात आला आहे!

Redme Y3 Specifications:
डिस्प्ले : 6.26-inch HD+ Dot Notch
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 632
GPU: Adreno 506
रॅम : 3GB/4GB
स्टोरेज : 32GB/64GB (Expandable upto 512GB)
बॅटरी : 4000mAh
ऑपरेटिंग सिस्टिम : MIUI 10 based on android 9 Pie
कॅमेरा : 12MP+2MP with AI, Google Lens Support, EIS
फ्रंट कॅमेरा : 32MP f/2.0 AI Auto HDR Super Selfie
रंग : LiElegant Blue, Bold Red, Prime Black
सेन्सर : E-Compass, Light Sensor, Proximity, Gravity, Accelerometer
इतर : Gorilla Glass 5, Dual Sim + microSD Card Slot, Bluetooth 5.0, 3.5mm Audio Jack
किंमत : ₹9999 (3GB+32GB)
₹11999 (4GB+64GB)
हा फोन ३० एप्रिलपासून अॅमेझॉन व mi.com वर उपलब्ध होत आहे.

Redmi Y3 सोबत Redmi 7 हा फोनसुद्धा सादर झाला आहे. Redmi 7 मध्ये Snapdragon 632 प्रोसेसर, 6.26″ HD+ डिस्प्ले, 12MP + 2MP dual rear camera, 8MP selfie camera Corning Gorilla Glass 5, 4000mAh बॅटरी मिळेल. हा फोन Lunar Red, Comet Blue or Eclipse Black या रंगात उपलब्ध होईल. या फोनची किंमत ₹७९९९ (2GB+32GB), ₹८९९९ (3GB+32GB) हा फोन २९ एप्रिल पासून अॅमेझॉन व mi.com वर मिळेल.

यासोबत आणखी उत्पादन सादर करण्यात आलं असून Mi LED Smart Bulb हा फोनद्वारे नियंत्रित करता येणारा बल्ब आहे. यामध्ये लाखो रंगांपैकी हवे ते रंग निवडता येऊ शकतात. यासाठी स्वतंत्र हबची गरज नसून हा बल्ब जोडायचा आणि फोनसोबत पेयर करून वापरायला सुरुवात करायची! याला गूगल असिस्टंट व अलेक्सा दोन्ही व्हॉईस असिस्टंटचा सपोर्ट देण्यात आला आहे ज्यामुळे यापैकी कोणतही स्मार्ट होम उपकरण आपल्याकडे असेल तर त्याद्वारे आपण हा बल्ब नियंत्रित करू शकाल!

Update 16-06-2019 : हा बल्ब आता फ्लिपकार्ट व अॅमेझॉनवर उपलब्ध झाला आहे.
लिंक :
http://fkrt.it/w8t2~cNNNN (किंमत ₹१२९९)
लिंक :
https://amzn.to/2ImYrtD

Search Terms : Xiaomi Redmi Y3, Redmi 7, Mi LED Smart Bulb launched in India Check Availability, Pricing

Exit mobile version