मायक्रोसॉफ्ट सर्फेस हब 2S सादर : टचस्क्रीन डिजिटल व्हाइटबोर्ड !

मायक्रोसॉफ्टने त्यांच्या सर्फेस प्रॉडक्ट्समध्ये नेहमीच नावीन्य आणलं आहे. टॅब्लेट्स, लॅपटॉप्स, पीसी व आता व्हाइटबोर्ड (थोडक्यात फळा समजा) यापूर्वीच्या मॉडेलमध्ये सुधारणा करत आता यामध्ये ५० इंची एचडी टचस्क्रीन, बॅटरी जोडण्यात आली आहे ज्यामुळे हा कोठेही हलवता येऊ शकेल. याचा डिस्प्ले 4K रेजोल्यूशन असलेला असून याला नव्याने उपलब्ध करून दिलेल्या चाकांमुळे मीटिंगदरम्यान एका ठिकाणाहून दुसरीकडे नेता येईल व प्रेझेंटेशन आणखी सोपं होईल! यामध्ये विंडोज १० पूर्ण क्षमतेने काम करेल. सोबत ऑफिस 365, Teams, AI आहेतच. अशा उत्पादनामुळे ऑफिसेसचं भविष्य कशा प्रकारे दिसू शकेल याची झलक पाहायला मिळत आहे!

मोठ्या स्क्रीनवर स्पर्श करत एकाचवेळी अनेक ठिकाणांहून कर्मचार्‍यांना एकमेकांशी व्हिडिओ संवाद साधता येईल, एकमेकांच काम शेअर करता येईल, लगोलग बदलही करता येतील. यासाठी हाताने स्पर्श करता येईल व सोबत सर्फेस पेनचाही आकृत्या, शब्द लिहिण्यासाठी वापर करता येईल! यामुळे कंपन्यांचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचू शकतो. याबद्दलचा द व्हर्जचा व्हिडिओ पाहू शकता : https://youtu.be/GSUHgrjwBb4

हा मायक्रोसॉफ्ट सर्फेस हब 2S जून महिन्यात उपलब्ध होत असून याची किंमत $8,999.99 (~₹ ६,२६,०००) असेल तर अतिरिक्त उपकरणांसहित घेतल्यास जवळपास $12,000 (~₹ ८,३४,०००) पर्यंत जाते! ५० इंची डिस्प्ले सह आणखी एक ८५ इंची मॉडेलसुद्धा यावेळी प्रदर्शित करण्यात आलं!

Image Source : The Verge

Surface Hub 2S Specs
50-inch 3:2 IPS 60Hz PixelSense display (3840 x 2560)
Intel 8th Gen Core i5 processor
Front-facing three-way stereo speakers
8GB DDR4 RAM
128GB M.2 solid state drive (SSD)
Wi-Fi / Ethernet port
Graphics : Intel® UHD Graphics 620
Sensors : Doppler occupancy, Accelerometer, Gyroscope
Dimensions : 29.2″ x 43.2″ x 3.0″ (741 mm x 1097 mm x 76 mm)
Weight : 61.6 lb (28 kg)
इतर : USB A + USB C, Bluetooth Wireless 4.1, Microsoft Surface Hub 2 Pen

Search Terms : Microsoft Surface Hub 2S launched

Exit mobile version