जिओने त्यांच्या प्राइम ग्राहकांना उपलब्ध करून दिलेल्या काही सेवा ज्या JioXpressNews, JioMags व JioNewsPaper या नावाने ओळखल्या जायच्या त्यांना एकत्र करून आता नवं स्वतंत्र अॅप सादर केलं आहे. या नव्या अॅपचं नाव जिओ न्यूज असं असणार आहे. या अॅपद्वारे स्थानिक भाषांमध्ये विविध ठिकाणच्या बातम्यांचे लेख, व्हिडिओ पाहता येतील! ही सेवा मराठीसह १२ भाषांमध्ये उपलब्ध असेल.
जिओच्या माहितीनुसार या सेवेमध्ये १५० हून अधिक लाईव्ह न्यूज चॅनल्स, ८०० हून अधिक मासिके (मॅगझिन्स) व २५० हून अधिक वृत्तपत्रांच्या डिजिटल आवृत्त्या वाचता वा पाहता येतील! यासाठी आपण होमपेजवर आपल्या आवडीचे विषय, स्त्रोत, भाषा निवडून त्यानुसार कंटेंट पाहू शकू. विषय निवडीसाठी खेळ, राजकारण, तंत्रज्ञान, आरोग्य असे बरेच पर्याय देण्यात आले आहेत.
जिओची टेलीकॉम सेवा घेऊन त्याअंतर्गत प्लॅन्सनुसार रीचार्ज करताच प्राइम सेवा मिळते. त्यामध्ये अशा बर्याच सेवा मोफत उपलब्ध आहेत. अँड्रॉइडसाठी उपलब्ध अॅप्स इथे पाहू शकाल.
जिओ ग्राहकांना ही सेवा पूर्णपणे मोफत असून नॉन जिओ ग्राहकांना ९० दिवस या सेवेची ट्रायल घेता येईल. ही सेवा अँड्रॉइड, iOS व वेबसाइटवर उपलब्ध आहे.
Search Terms : JioNews App launched News, Videos, Live TV, Magazines with Marathi Support