गूगल अर्थया सेवेमध्ये सॅटेलाइटद्वारे पूर्ण पृथ्वी मॅप करून उपलब्ध करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षापासून ही सेवा विविध ठिकाणांबद्दल माहिती पुरवत आहे. यामधील एक खास सोय म्हणजे गूगल अर्थ टाइम लॅप्स. ही सेवा १९८४ पासून २०१८ पर्यंत जगभरच्या सर्व ठिकाणांमध्ये झालेले बदल दरवर्षीच्या फ्रेम्स स्लाईडशोसदृश स्वरुपात दाखवते!
आता ही Earth Timelapse सेवा मोबाइल फोन्स व टॅब्लेटवरही उपलब्ध करून देण्यात आली आहे. आपल्या शहरामध्ये झालेला बदल आता अगदी कुठेही पाहता व दाखवता येईल! अगदी उदाहरणच दाखवायच तर खाली हिंजवडी (पुणे) गावामध्ये झालेला मोठा बदल स्पष्ट पाहू शकता.
ही सेवा योग्य रीतीने पाहण्यासाठी ब्राऊजरमध्ये ऑटोप्ले सुरू असायला हवं. या सेवेचा अनेक अर्थांनी वापर होऊ शकतो. बदलणार्या शहरांची अभ्यासपूर्ण माहिती जमवता येऊ शकते. त्यांच्या प्लॅनिंगमध्येही याची मदत होऊ शकते.
गूगल अर्थ टाइम लॅप्स लिंक : https://earthengine.google.com/timelapse/