USB4 जाहीर : 40Gbps ट्रान्सफर स्पीड मिळेल!

USB 3.2 च्या तुलनेत दुप्पट वेगाने होईल डेटा ट्रान्सफर!

आताच्या काळात डेटा ट्रान्सफर करण्यासाठी वापरलं जाणारं माध्यम म्हणजे यूएसबी. यूएसबीची विविध रूपं वेगवेगळ्या उपकरणांद्वारे आपण वापरत असतो. उदाहरणार्थ सांगायच तर आपण वापरत असलेला पेनड्राइव्ह यूएसबी आधारितच असतो. स्मार्टफोन्स, कॅमेरा, प्रिंटर्स, डोंगल्स, किबोर्ड, माऊस, इ सर्व उपकरणे आता यूएसबीद्वारेच जोडलेली असतात. डेटा ट्रान्सफरसोबत पॉवर देण्यासाठीही आता यांचा वापर होतो. तर यापूर्वीच्या यूएसबी 2.0, 3.0 नंतर आता नवं USB4 सादर करण्यात आलं आहे ज्याचा वेग 40Gbps पर्यंत असेल!

USB संबंधित वेग व सुविधांची निश्चिती USB Implementers Forum (USB IF) यांच्यातर्फे केली जाते. यूएसबी इम्प्लीमेंटर्स फोरम यूएसबी ह्या स्टँडर्डच्या प्रचार आणि प्रसारासाठी काम करणारी संस्था आहे. USB, Wireless USB, USB On-The-Go अशा गोष्टींची देखरेख ते पाहतात. या संस्थेची स्थापना 1995 मध्ये झाली होती आणि एचपी, अॅपल, मायक्रोसॉफ्ट, एनईसी, इंटेल व Agere Systems हे या संस्थेचे सदस्य आहेत.

USBवेग तांत्रिक नाव
USB440 GbpsUSB4
USB 3.220 GbpsUSB 3.2 Gen 2×2
USB 3.110 GbpsUSB 3.2 Gen 2 (आधी USB 3.1 Gen 2)
USB 3.05 GbpsUSB 3.2 Gen 1 (आधी USB 3.1 Gen 1)

या USB IF ने जाहीर केल्यानुसार यापुढील यूएसबी स्टँडर्ड USB4 असेल. यामध्ये ट्रान्सफर स्पीड 40Gbps असा असेल. सध्या वापरात असलेलं USB 3.2 स्टँडर्ड 20Gbps पर्यंत वेगात ट्रान्सफर करू शकत आहे. मात्र USB4 केवळ Type C प्रकारच्याच पोर्ट्सवर काम करण्याची शक्यता आहे. या नव्या USB4 मुळे Thunderbolt 3 या आणखी एक अतिवेगवान स्टँडर्डसोबत चालू लागेल. Thunderbolt 3 या स्टँडर्डमध्ये 40Gbps चा वेग २०१५ पासून मिळत आहे!

आता USB4 मुळे वाढलेला वेग आणि 100W पॉवर डिलिव्हर करण्याची क्षमता याद्वारे एक्सटर्नल जीपीयू वापरता येतील आणि ते सुद्धा दोन 4K मॉनिटर्सना एकाच वेळी आउटपुट पुरवू शकतील!
Thunderbolt 3 ला सध्या इंटेलकडे लायसन्स फी द्यावी लागते. थंडरबोल्टचा मालकी हक्क सध्या इंटेलकडे आहे. इंटेलने २०१७ मध्ये जाहीर केलं होतं कि थंडरबोल्ट रॉयल्टी फ्री बनवण्यात येईल. ते पूर्ण करत Thunderbolt 3 ला यूएसबीमध्ये जोडण्यात येत आहे. यूएसबी स्टॅंडर्ड सर्वांसाठी खुलं आहे त्यामुळे कोणतीही कंपनी आता याचा वापर करून हाय डेटा स्पीड असलेली उपकरणे बाजारात आणू शकेल ज्याचा ग्राहकांना नक्कीच मोठा फायदा होईल.

USB4 मधील काही खास सोयी :
• Two-lane operation using existing USB Type-C cables and up to 40 Gbps operation over 40 Gbps- certified cables
• Multiple data and display protocols to efficiently share the total available bandwidth over the bus
• Backward compatibility with USB 3.2, USB 2.0 and Thunderbolt 3

Exit mobile version