स्टेडिया : गूगलची क्लाऊड गेमिंग सेवा सादर : ब्राऊजरमध्येच गेम्स खेळा!

सध्याच्या काळात गेमिंग म्हटलं की गेमिंग पीसी, गेमिंग कॉन्सोल किंवा आता आता गेमिंग स्मार्टफोन्स समोर येतात. गेली कित्येक वर्षं गेमिंगसाठी यापैकी एक साधन वापरलं जातं. यासाठी पीसी/कॉन्सोल/स्मार्टफोन यांची स्वतंत्र खरेदी करून गेम्स विकत घेऊन डिस्कद्वारे/डाऊनलोड करून मग खेळता यायच्या… गूगलच्या या नव्या थेट क्लाऊडद्वारे गेम स्ट्रिमिंग सेवा देणार्‍या स्टेडिया (Stadia) मुळे मात्र यामध्ये आमुलाग्र बदल होण्याची शक्यता आहे!

स्टेडियामुळे तुम्ही सध्या कोणत्याही प्रकारच्या गेमिंग डिव्हाईसवर असाल तरीही तुम्हाला इंटरनेटवर क्रोम ब्राऊजरमधून गेम्स लाईव्ह खेळता येतील तेही त्यासाठीचं हार्डवेअर नसताना! आहे न कमाल…! गेमच्या डेव्हलपरनी गूगलसोबत काम करून गेम डेव्हलप करायची. ती गूगलच्या डेटा सेंटरवर साठवली जाईल त्यानंतर जेव्हा जेव्हा प्लेयर गेम खेळण्यासाठी येईल तेव्हा तेव्हा ती गेम ब्राउझरमध्येच इंटरनेटने क्लाऊडला जोडले जाऊन ऑनलाईन खेळता येईल ते सुद्धा 1080p
60FPS मध्ये + 4K 60FPS सपोर्ट
देण्यात येईल तसेच येत्या काळात 8K सपोर्ट सुद्धा दिला जाईल अस गूगलने जाहीर केलं आहे…! काही महिन्यांपूर्वी प्रोजेक्ट स्ट्रिमद्वारे याची झलक दाखवण्यात आली होती. आता इतक्यात अनेकांना ही संकल्पना समजणारही नाही. यासाठी हा व्हिडिओ पाहू शकता. लिंक : https://youtu.be/nUih5C5rOrA?t=2016

Google Stadia in Action on Chromebook, Smartphone, PC, Tablet, ChromeCast

गूगलने दिलेल्या डेमोनुसार प्रथम क्रोमबुकद्वारे असासीन्स क्रीड गेमने सुरुवात केली. ज्या गेमचं ग्राफिक्स उच्च प्रतीच मानलं जातं. गेम सुरू असताना मध्येच ती गेम सोडून नंतर एका फोनवर सुरू केली तर ती गेम आधी ज्या ठिकाणी/वेळी सोडली होती तिथूनच पुढे सुरू झाली! त्यानंतर पीसीवरही तेच… हे या सेवेचं खास वैशिष्ट्य आहे की तुम्ही कोणत्याही प्रकारच उपकरण वापरा त्यावर तुम्हाला मोठ्या ग्राफिक्सअसलेल्या गेम्सही सहज खेळता येतील…लॅपटॉप, पीसी, टॅब्लेट, फोन, क्रोमकास्ट जोडलेल्या टीव्हीवरसुद्धा…! आणि तुम्ही आधी वापरलेल उपकरण ती वेळ गूगलकडे साठवेल आणि तुम्ही पुढच्या वेळी ती गेम उघडताच त्याच पॉइंटला सुरू झालेली दिसेल!

गूगलने यासाठी एक स्वतंत्र कॉन्सोलसुद्धा जाहीर केला असून यामध्ये स्ट्रिमिंगसाठी व गूगल असिस्टंटसाठी बटणे देण्यात आली आहेत. हा तीन रंगात उपलब्ध होईल. मात्र गूगलने यावेळी असंही सांगितलं आहे कि तुमचे सध्याचे कंट्रोलर, किबोर्ड/माऊस सुद्धा स्टेडियामध्ये चालतीलच!

गूगल स्टेडिया २०१९ मध्येच ग्राहकांना उपलब्ध होणार असून त्यांनी सध्या अधिकाधिक डेव्हलपर्सना त्यांच्या गेमिंग प्लॅटफॉर्मवर येण्याचं आवाहन केलं आहे त्यांना https://stadia.dev वर अधिक माहिती देण्यात आली आहे. यासोबत गूगलने स्वतःचा गेमिंग स्टुडिओ Stadia Games & Entertainment जाहीर केला आहे ज्याद्वारे त्यांच्याकडून गेम्स स्वतः डेव्हलप करून सादर केल्या जातील. स्टेडियामध्ये गूगलने यूट्यूबद्वारे स्ट्रिमिंगसाठीही अनेक पर्याय उपलब्ध करून दिले असून यासाठी काही क्रिएटर्सना चाचणीची संधी देण्यात आली आहे.

याचा कॉसोल/पीसी गेमिंगवर काय परिणाम होतो ते येणारा काळच ठरवेल. वरवर स्टेडियाच्या सोयी चांगल्या असल्या तरी त्यालासुद्धा बरीच बंधने असणार आहेत जसे की कायम इंटरनेट सेवा सुरू असण्याची गरज, गेम दरम्यान अतिशय वेगवान इंटरनेट, इ. मात्र या प्लॅटफॉर्ममुळे गेमिंग क्षेत्रात काहीतरी नवीन नक्की पहायला मिळेल. शेवटी किती गेम डेव्हलपर्स या सेवेमध्ये सहभागी तो प्रश्न आहेच…

https://youtu.be/HikAuH40fHc
Exit mobile version