अॅपल इव्हेंट २०१९ : टीव्ही प्लस, न्यूज प्लस, कार्ड, आर्केड जाहीर!

टीव्ही स्ट्रिमिंग व गेमिंग सबस्क्रिप्शन सेवा जाहीर : आता नेटफ्लिक्ससोबत स्पर्धा!

आज झालेल्या अॅपल इव्हेंटमध्ये बर्‍याच गोष्टी जाहीर केल्या असून यामधील ठळक गोष्टी म्हणजे अॅपल न्यूज प्लस, अॅपल आर्केड, अॅपल कार्ड, अॅपल टीव्ही चॅनल्स व अॅपल टीव्ही प्लस!

अॅपल न्यूज प्लस : पूर्वीच्या मोफत अॅपल न्यूजमध्ये मॅगॅझीन्ससारख्या गोष्टींची जोड देऊन आता सबस्क्रिप्शनच्या रूपात सादर केली आहे! यासाठी दरमहा $9.99 (~₹ ६७०) द्वावे लागतील. (सध्या अमेरिका व कॅनडामध्येच उपलब्ध). यामध्ये फॅमिली शेयरिंग सुविधा देण्यात आलेली असेल ज्यामुळे त्याअंतर्गत जोडलेल्या अकाऊंट्सवरही एकाच सबस्क्रिप्शनद्वारे बातम्या, मॅगॅझीन्स वाचता येतील! पहिला महिना पूर्ण मोफत असेल. या सेवेमध्ये मॅगॅझीन्सच कव्हर ‘लाईव्ह कव्हर’ प्रकारच पाहायला मिळेल जे काही सेकंदाच्या व्हिडिओ/ अॅनिमेशन रूपात दिसतील. सबस्क्रायबर्सना जवळपास ३०० मॅगॅझीन्स उपलब्ध असतील. वॉल स्ट्रीट जर्नल, लॉस एंजिलीस टाइम्स सारख्यांसोबत भागीदारीही करण्यात आलेली आहे. व्हिडिओ लिंक : https://youtu.be/Im5c5WR9vMQ

अॅपल आर्केड : खरं सांगायच तर कोणीही आयफोनला गेमिंग उपकरण म्हणून प्रामुख्याने पाहत नसेल मात्र अॅपलला तसं वाटतं आणि त्यासाठी त्यांनी आता गेमिंग सबस्क्रिप्शन सेवा उपलब्ध करून दिली आहे! यामध्ये खास बनवलेल्या १००+ गेम्सचा समावेश असणार आहे. या गेम्स आयफोन, आयपॅड, अॅपल टीव्ही, मॅक कम्प्युटर अशा सर्वच उत्पादनांवर ऑफलाइन खेळता येतील! या सेवेची फी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
व्हिडिओ लिंक : https://youtu.be/67umVefSXnY

अॅपल कार्ड : ही सेवा आयफोनवर उपलब्ध असेल आणि हे कार्ड डिजिटली फोनवर वॉलेटमध्ये साठवलेल असेल. यामध्ये आपण स्टेटमेंट, बॅलन्स, पेमेंटच्या तारखा पाहू शकाल. या कार्डसाठी कोणत्याही CVV, कार्ड नंबर, एक्सपायरी डेटची गरज नाही. (ज्याठिकाणी सपोर्ट नाही तेव्हा तयार करण्याची सोय आहे). हे कार्ड गोल्डमन सॅच आणि मास्टरकार्ड यांच्या सहकार्याने बनवलेल असेल. हे वापरल्यास २% कॅशबॅकचीही सोय करण्यात आली आहे. यासोबत तुम्ही हवं असल्यास खरं कार्डही मागवु शकाल जे टायटॅनियमपासून तयार केलं आहे आणि यावर अॅपल लोगो, तुमचं नाव आणि चीप याशिवाय काहीही छापलेल नसेल! हवी असलेली माहिती अॅप उघडून पाहू शकाल. याच्या भारतातील उपलब्धेबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
व्हिडिओ लिंक : https://youtu.be/HAZiE9NtRfs

अॅपल टीव्ही चॅनल्स : या अपडेटनुसार अॅपल टीव्हीमध्ये तुम्हाला हव्या असलेल्या चॅनल्सची निवड करता येईल. ही सोय तूर्तास अमेरिकेतील ग्राहकांना समोर ठेऊन उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. HBO, PBS, CBS, इ प्रसिद्ध वाहिन्यांची निवड करून तेव्हढ्याच वाहिन्यांचे पैसे देता येतील! याच्याही किंमतीची माहिती देण्यात आलेली नाही.

अॅपल टीव्ही प्लस : आज सर्वात चर्चेचा विषय ठरलेली ही सेवा अॅपलच्या स्वतःच्या टीव्ही प्रोग्रॅम्ससाठी आहे. अद्याप यामध्ये कोणते चित्रपट/मालिका उपलब्ध होतील याची फारशी माहिती देण्यात आलेली नाही. मात्र यामधील कंटेंट ऑफलाइन व ऑनलाइन अशा दोन्ही स्वरुपात पाहता येऊ शकेल असं सांगण्यात आलं आहे. यावेळी मंचावर ओप्रा विंफ्री, रीझ व्हिदरस्पून, जेनीफर अॅनिस्टन, दिग्दर्शक स्टीव्हन स्पिलबर्ग, जेसन मोमोआ, स्टीव्ह करेल, अल्फ्रे वूडर्ड, कुमैल नांजीयानी यांना बोलण्याची संधी देण्यात आली होती. या कलाकारांच्या मालिका, डॉक्युमेंट्री खास अॅपल टीव्ही प्लसवरच पाहायला मिळतील.
काही महिन्यापूर्वी प्रसिद्ध दिग्दर्शक स्टीव्हन स्पिलबर्ग जे नेटफ्लिक्ससारख्या माध्यमावर टीका करत होते आणि आता थेट अॅपल टीव्ही प्लसमध्ये सहभागी झालेलं पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं.

https://youtu.be/Bt5k5Ix_wS8

थोडक्यात सांगायचं तर या कार्यक्रमात जाहीर करण्यात आलेल्या गोष्टी अजिबात विशेष नाहीयेत. साध्या साध्या गोष्टीसुद्धा समोर प्लस जोडून मोठा गाजावाजा करत सादर केल्या आहेत अर्थात यावर सोशल मीडियावर नकारात्मक प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. बाकी या सेवा प्रत्यक्ष समोर आल्यावर अॅपलच्या चाहत्यांना सोडून इतरांना किती आवडतील हे नंतर समजेलच… बाकी अॅपल इको सिस्टिमचा भाग बनलेल्या लोकांना मात्र अॅपलचं काहीही आवडतंच हे काही वेगळ सांगायची गरज नाही 😜

Search Terms Apple News Plus Apple Card Apple Arcade Gaming Subscription Service Apple TV Channels TV Plus Subscription Service

Exit mobile version