शायोमीने त्यांचा नवा फ्लॅगशिप फोन Mi 9 चीनमध्ये सादर केला असून यामध्ये सर्वोत्तम सुविधा त्यासुद्धा नेहमीपेक्षा कमी किंमतीत देण्यात आल्या आहेत! सध्या बाजारात असलेल्या फोन्सच्या मानाने फार कमी किंमतीत सर्वोत्तम प्रोसेसर, मागे तीन कॅमेरा ज्यामधला एक 48MP असेल, 20W वायरलेस चार्जिंग अशा भन्नाट सोयी देण्यात आल्या आहेत!
याचा डिस्प्ले 6.39 इंची Super AMOLED असून याचं रेजोल्यूशन 2280×1080 असेल. फोनमध्ये देण्यात आलेला Snapdragon 855 अद्याप स्मार्टफोन बाजारात कोणत्याही फोनवर उपलब्ध नाही. वनप्लस व आता शायोमी यांनीच या प्रोसेसरवर आधारित फोन्सची घोषणा केली आहे! यामधल फास्ट चार्जिंग नक्कीच नावीन्य पूर्ण असेल कारण यापूर्वी वायर शिवाय चार्जिंगची सुविधा देणार्या फोन्सचा चार्जिंग वेग बराच कमी असायचा मात्र या फोनमध्ये थेट 20W चा वायरलेस चार्जिंगची सोय देण्यात आलेली आहे शिवाय 27W चा वायर्ड चार्जर असेलच!
Xiaomi Mi 9 Specs :
डिस्प्ले : 6.39-inch Super AMOLED 2280x1080px Gorilla Glass 6
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 855
GPU : Adreno 640
रॅम : 6GB/8GB/12GB
स्टोरेज : 128GB/256GB
कॅमेरा : 48MP f/1.75 + 16MP f2.2 + 12MP f/2.2 2160 @ 30fps
फ्रंट कॅमेरा : 20MP 1080p @ 30fps
बॅटरी : 3300mAh with 27W fast charging
ऑपरेटिंग सिस्टिम : MIUI10 based on Android 9 Pie
वजन : 173g
इतर : WI-Fi 802.11 a/b/g/n/ac, USB Type-C, Bluetooth 5.0, 20W Wireless Charging
रंग : Lavender Violet, Ocean Blue, Piano Black
किंमत : (भारतीय किंमत उपलब्ध झाल्यावर अपडेट केली जाईल)
Mi 9 CNY 2,999 (~₹३२०००) (6GB)
Mi 9 CNY 3,299 (~₹३५०००) (8GB)
Mi 9 Explorer Edition : CNY 3,999 (~₹४२०००)