स्टार्टअप इंडिया व्हॉट्सअॅप चॅलेंज जाहीर : १.८ कोटींची बक्षिसं!

भारतामधील लघु उद्योग व स्टार्टअप्सच्या वाढीसाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने व्हॉट्सअॅपने इन्व्हेस्ट इंडियासोबत भागीदारीमध्ये स्टार्टअप इंडिया व्हॉट्सअॅप ग्रँड चॅलेंज जाहीर केलं आहे. यामध्ये जिंकणार्‍या टॉप ५ जणांना $2,50,000 (~₹१.८ कोटी) दिले जाणार आहेत!

व्हॉट्सअॅपने healthcare, rural economy, financial and digital inclusion, education व citizen safety अशा थीम्स निवडल्या आहेत. भारतातील समस्या सोडवण्याच्या दृष्टीने भन्नाट कल्पना असणार्‍या उद्योजकांना आमंत्रण देत आहोत असं व्हॉट्सअॅपतर्फे सांगण्यात आलं आहे.

अधिकृत माहिती लिंक startupindia.gov.in

या लिंकवर क्लिक करून नोंदणी, चॅलेंज संदर्भातील माहिती पाहू शकता.

याची नोंदणी १० मार्च २०१९ पर्यंत करता येणार आहे. नोंदणी केलेल्यांचे अर्ज एक समिती तपासेल त्यानंतर ३० उत्तम कल्पना बाजूला काढून त्यानंतर पुढील राऊंडमध्ये १० जण निवडून त्यांना ग्रँड फिनालेसाठी बोलावलं जाईल आणि मग त्यातून ५ सर्वोत्तम कल्पना निवडल्या जातील. या पाच विजेत्यांना २४ मे रोजी प्रत्येकी $50,000 (~₹ ३६ लाख) दिले जातील.

सध्या भारतात जवळपास २० कोटी लोक व्हॉट्सअॅप वापरत आहेत. आता व्हॉट्सअॅपने खास बिझनेस यूजर्ससाठी वेगळ व्हॉट्सअॅप बिझनेस सुद्धा उपलब्ध करून दिलेलं आहे. याद्वारे उद्योगांना त्यांच्या ग्राहकांपर्यंत सहज पोहोचण्यास मदत होत आहे. सध्या ५० लाख उद्योग व्हॉट्सअॅप बिझनेसद्वारे ग्राहकांना सेवा देत आहेत!

Exit mobile version