पब्जी मोबाइलचं नवं अपडेट 0.11.0 आता झोंबींसोबतसुद्धा लढत!

टेनसेंट गेमिंगने लोकप्रिय गेम पब्जी मोबाइलसाठी त्यांचं नवं अपडेट आता उपलब्ध करून दिलेलं असून या अपडेट द्वारे आता रेसिडेंट एव्हील २ या दुसर्‍या गेममधील झोंबींसोबतसुद्धा लढता येईल. थोडक्यात हा मोड या दोन गेम्सचा क्रॉसओव्हर असेल. यासाठी स्वतंत्र आर्केड मोड देण्यात आलेला असून हा काही दिवसांसाठीच उपलब्ध असेल.

या 0.11.0 अपडेटची डाऊनलोड साइज 436MB आहे मात्र काही जणांना 1.6GB पर्यंत डाऊनलोड करावं लागल्याचही दिसून आलं आहे त्यानुसार डेटा पाहून अपडेट करा. हे अपडेट आता प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. या Zombie मोडला Survive Till Dawn असं नावसुद्धा देण्यात आलेलं आहे! मोबाइल गेमिंगसाठी आणखी नावीन्य आणण्यात टेनसेंट दिवसेंदिवस आघाडी घेत असल्याच दिसून येत आहे.

ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी झोंबी (Zombies) म्हणजे मेलेला माणूस जिवंत होऊन नरभक्षक बनतो (अर्थात कल्पनेत). बऱ्याच गेम्समध्ये व काही टीव्ही मालिकांमध्येही यांना दाखवण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

PUBG Mobile Update 0.11.0 zombie mode मध्ये आलेल्या नव्या गोष्टी आणि बदल

PUBG MOBILE X Resident Evil 2 Crossover Trailer
Exit mobile version