जपानी उद्योजक युसाकू मायेजावाने सर्वाधिक रिट्विट केलं गेलेल्या ट्विटचा विक्रम मोडला असून त्या ट्विटमध्ये रिट्विट करणार्या १०० ट्विटर यूजर्सना पैसे देण्याचं जाहीर केलं होतं. त्याच्या झोझोटाऊन या वेबसाइटवर मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याच्या आनंदात हे करत असल्याच ट्विटमध्ये म्हटल आहे!
YouSuck2020 असं यूजरनेम असलेल्या युसाकूने त्याला फॉलो करणार्या आणि ते ट्विट रिट्विट करणार्याना डीएमद्वारे संपर्क साधून कोणालाही निवडून पैसे मिळतील असं सांगितलं आणि ट्विटर या सोशल मीडिया वेबसाइटवरचा रिट्विटचा रेकॉर्ड मोडीत निघाला! त्याने प्रत्येक 1 मिलियन जपानी येन्स म्हणजे जवळपास ७ लाख रुपये देण्याचं सांगितलं आहे!
युसाकूबद्दल आणखी सांगायचं म्हणजे तो जपानी उद्योजक असून स्पेसएक्सच्या चंद्रमोहिमेद्वारे २०२३ मध्ये चंद्रावर जाणार आहे.
आता हे ट्वीट ५५ लाखाहून अधिक वेळा रिट्विट केलं गेलं आहे!
(लेख लिहित असताना 5,592,940+)
यापूर्वीचा विक्रम कार्टर विल्करसन याच्या नावे होता ज्याने वेंडीज या प्रसिद्ध फास्ट फूड रेस्टोरंटच्या ट्विटर हॅंडलवर मोफत चिकन नगेट मिळवण्यासाठी किती रिट्विट असा प्रश्न विचारल्यावर आलेल्या 18 मिलियन उत्तरावर सर्वांना आवाहन करत रिट्विटचा रेकॉर्ड केला होता! त्यापूर्वी एलेन डीजनरसचं ऑस्करमधील सेल्फीचं ट्विट सर्वाधिक आरटी मिळवणारं ठरलं होतं!
- Yusaku Maezawa : @yousuck2020
- Carter Wilkerson : @carterjwm
- Ellen DeGeneres : @TheEllenShow