नोव्हेंबर महिन्यात व्होडाफोन आयडियाचे ६५ लाख ग्राहक कमी!

COAI च्या माहितीनुसार नोव्हेंबर २०१८ मध्ये व्होडाफोन आयडियाने ६५ लाख ग्राहक गमावले असून अजूनही एकत्रित असल्यामुळे यांची ग्राहकसंख्या ४२ कोटींवर आहे! दरम्यान एयरटेलने एक लाख ग्राहकांची भर घातली असल्याचीही माहिती समोर येत आहे! सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये ग्राहक गमावल्यावर प्रथमच ग्राहक नव्याने जोडलेले पाहून एयरटेलला नक्कीच हायस वाटलं असेल…!

COAI च्या माहितीनुसार व्होडाफोन आयडिया यांनी सलग तिसर्‍या महिन्यात ग्राहक गमावले असून हे त्यांच्या विलीनीकरणानंतर पाहायला मिळत आहे हे विशेष! दुसरीकडे जिओ मात्र अजूनही ग्राहक जोडण्यात यशस्वी ठरत असून ऑक्टोबरमध्ये जिओने आणखी कोटी ग्राहक जोडून संख्या एकूण २६.२३ कोटींवर नेली आहे!

ADVERTISEMENT

COAI (Cellular Operators Association of India) संस्था बीएसएनएल, एमटीएनएल, टाटा व रिलायन्स कम्युनिकेशन्स यांच्या दरमहा ग्राहकांची नोंद ठेवत नाही. जिओ बाबतची माहिती ट्राय (TRAI) कडून प्रसिद्ध केलेल्या माहितीवर अवलंबून आहे!

Exit mobile version