अॅपद्वारे कॅब सेवेमध्ये जगभरात आघाडीला असलेली उबर कंपनी आता मुंबईमध्ये UberBoat नावाची बोट सेवा सुरू करत आहे. यामध्ये ग्राहकांना अॅपद्वारे तिकीट बुक करून बोट प्रवास करता येईल.
ही सेवा १ फेब्रुवारी पासून सुरू होत असून याद्वारे सहा प्रवाशांसाठी स्पीडबोट उपलब्ध असेल. गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा जेटी आणि गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटा पर्यंत असे दोन मार्ग सुरू करताना वापरले जाणार आहेत. ही ग्रुप बोट सेवा ५७०० ते ९५०० रु प्रती बोट अशा किंमतीत उपलब्ध असेल. नव्या स्पीडबोट्समुळे नेहमीच्या फेरी प्रवाशांना सध्या लागणारा एक तास वेळ वीस मिनिटांवर येईल! सध्यातरी या बोटांसाठी फिक्स्ड किंमत असून डायनॅमिक प्रायसिंग नसेल.
ADVERTISEMENT
उबर इंडियाकडून ही सेवा लवकरच आणखी शहरांना जोडण्यात येणार आहे!