लोकप्रिय वेबसाइट कोरा (Quora) आता मराठीत!

विविध विषयांवर मराठी भाषेत प्रश्नोत्तरे!

अनेकविध प्रश्नांच्या उत्तरांसाठी जगभरात खास करून भारतात मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध असलेली वेबसाइट म्हणजे कोरा (Quora). ज्याला जो प्रश्न पडला असेल तो विचारायचा त्याचं उत्तर कोरावर उपस्थित मंडळीपैकी संबंधित ज्ञान असलेली व्यक्ती उत्तर देते! ह्या माध्यमातून अनेक विषयांना स्पर्श करणारं मोठं ज्ञान कोरा/क्वोरावर आता उपलब्ध झालेलं आहे.

आता ही वेबसाइट आणखी अनेक भाषात उपलब्ध झाली असून मराठीसाठीही स्वतंत्र यूआरएलद्वारे आपण मराठी प्रश्नोत्तरे पाहू शकाल! खाली दिलेल्या यूआरएलवर जाऊन प्रश्न विचारू शकता किंवा जे अनुत्तरित प्रश्न आहेत त्यांची उत्तरे देऊ शकाल. आधीच दिलेल्या उत्तरावर प्रतिवाद करणं किंवा आणखी माहिती देणं हे सुद्धा करता येईल! अनेकांनी मराठीत प्रश्नोत्तरे देण्यास सुरुवातही केली आहे.

ADVERTISEMENT

Quora Marathi अधिकृत लिंक : https://mr.quora.com/

मराठीसोबत आता तामिळ, बंगाली व हिंदी या भारतीय भाषांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे कोरा एकूण १७ भाषांमध्ये वापरता येईल!

Exit mobile version