गूगलने गेल्या काही महिन्यात सर्व उत्पादनांमध्ये त्यांच्या खास मटेरियल डिझाईनची जोड देण्यास सुरुवात केली होती. Gmail वेबसाईटवर हे डिझाईन आणल्यानंतर आता जीमेल अॅप्सवर सुद्धा उपलब्ध करून देण्यात येत आहे!
जर तुम्ही जीमेल मोबाइल वेबसाइट वापरली असेल तर फारसा फरक जाणवणार नाही मात्र मोबाइल अॅपमध्ये एकूण रंगसंगतीमध्ये बर्यापैकी बदल होणार आहेत आणि पांढर्या रंगाचा वापर करून सपाट (फ्लॅट) रंग पहायला मिळतील. या नव्या रंगांमुळे विविध भाग पाहणं सोपं होईल असं गूगलला वाटतं!
गूगलच्या अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमच्या येत्या Android Q अपडेटमध्ये येणारा डार्क मोड सुद्धा या फारच पांढर्या दिसणार्या डिझाईनला जोडण्यात येईल अशी आशा आहे. येत्या काही आठवड्यात हे डिझाईन सर्व Android व iOS युजर्सना उपलब्ध करून देण्यात येईल. यासोबत इतर G Suite अॅप्समध्येही हे नवं डिझाईन जोडल जाईल…