आता व्हॉट्सअॅपमध्येच पहा युट्युब, फेसबुक व्हिडिओज! : PIP मोड सर्वांना उपलब्ध!

व्हॉट्सअॅपवर बाहेरच्या लिंक्स असलेले व्हिडीओसुद्धा व्हॉट्सअॅपमध्येच पाहण्याची सोय काही दिवसांपूर्वी चाचणीसाठी उपलब्ध झालेली होती ती आता सर्वांसाठी उपलब्ध होत आहे! याला PIP (पिक्चर इन पिक्चर) मोड असं म्हटलं जातं ज्यामुळे व्हॉट्सअॅप बाहेर न जात बाकीचे संदेश पाहत आपण त्या लिंकवरील व्हिडीओ व्हॉट्सअॅपमध्येच पाहू शकतो! व्हॉट्सअॅप अँड्रॉइडच्या नव्या अपडेटमध्ये (Version 2.18.280) ही सुविधा वापरता येईल! ही सोय iOS वर आधीच उपलब्ध आहे.

युट्युब, फेसबुक, इंस्टाग्रामसारख्या बाहेरच्या साइट्सवरील लिंक्स असलेले व्हिडिओ व्हॉट्सअॅपमध्येच पाहता येतील! तुम्हाला व्हिडीओचा थंबनेल प्रिव्हयु दिसणारा मेसेज आला कि त्यावर तुम्ही टॅप करून तो व्हिडीओ लगेच पाहू शकता जो प्रथम छोट्या विंडोमध्ये दिसेल जर फुलस्क्रिन पाहायचा असेल तर ती सोयसुद्धा देण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वीच व्हॉट्सअॅपवर स्टिकर्स पाठ्वण्याचीही सोय उपलब्ध झाली आहे. इतर नव्या गोष्टी उदा. ग्रुप कॉल मध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्ती आधीच निवडता येतील, डार्क मोड जो डोळ्यांचा त्रास कमी करेल, मल्टी शेअर, ग्रुप कॉल शॉर्टकट ह्या व्हॉट्सअॅपवर लवकरच उपलब्ध होत आहेत!
 
search terms whatsapp brings PIP mode for youtube, facebook, instagram videos to stable version

Exit mobile version