मराठीटेक २०१८ आणि पुढील वाटचाल

मराठीटेक या मराठी भाषेत तंत्रज्ञान विश्वातील माहिती देणार्‍या आमच्या उपक्रमासाठी २०१८ वर्ष उत्तम ठरलं. आजवर सर्वाधिक प्रतिसाद २०१८ या वर्षी मिळाला असून फेसबुक, ट्विटर, यूट्यूब अशा सर्वच माध्यमांवर मराठीटेकला यावेळी वाचकांचं मोठं सहकार्य लाभलं. गेल्याच महिन्यात एबीपी माझाच्या डिजिटल महाराष्ट्र कार्यक्रमातसुद्धा मराठीटेकला सहभागी होता आलं!

येत्या वर्षासाठी आम्ही आमची वेबसाइट आता नव्या प्लॅटफॉर्मवर आणली असून मराठीटेक आता ब्लॉगर ऐवजी वर्डप्रेसचा वापर करून टेक्नॉलॉजीमधील नवनव्या घडामोडी आपल्या समोर आणेल. आमची वेबसाइट नव्या रूपात उपलब्ध असून आता लेख वाचणं, संबंधित माहिती मिळवणं व शेअर करणं सोपं करण्यात आलं असून आम्हाला आशा आहे हे नवं रूप तुम्हाला लेख वाचण्यासाठी चांगला अनुभव देईल. याबद्दल प्रतिक्रिया/सूचना स्वागतार्ह असतील. कमेंट/ सोशल मीडियाद्वारे आम्हाला नक्की कळवा…

ADVERTISEMENT

लवकरच आम्ही मराठीटेकवर तंत्रज्ञान विषयासंबंधी लेखकांना आमंत्रित करणार असून त्यामाध्यमातून आपल्याला आणखी विषय आणि त्यांची माहिती उपलब्ध करून देता येईल. यादृष्टीने कोणी लेखक इच्छुक असल्यास आमच्याशी संपर्क साधू शकता…

खालील लेख २०१८ मध्ये मराठीटेकवर सर्वाधिक वाचले गेले

मराठीटेकने या वर्षी सोशल मीडियावरसुद्धा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यात यश मिळवलं. फेसबुक पेज, ट्विटर हॅंडल, यूट्यूब चॅनलमार्फत मराठीटेक मराठी भाषेत तंत्रज्ञानाबद्दल ज्यांना माहिती मिळवायची आहे अशा प्रत्येकापर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नात आहे. लवकरच आम्ही
लेख आणि व्हिडिओ नव्या स्वरुपात आणत आहोत. या माध्यमांवर मराठीटेकला फॉलो करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका…

Exit mobile version