लेनोवोने काल कार्यक्रमात त्यांचा पहिला तीन कॅमेरे असलेला फोन सादर केला ज्याचं नाव Lenovo Z5s असं आहे मात्र यानंतर आश्चर्याचा धक्का देत जगातला पहिला 12 GB असलेला स्मार्टफोन सादर केला तोसुद्धा क्वालकॉमच्या नवीन SD855 प्रोसेसर सोबत! या भन्नाट फोनचं नाव Lenovo Z5 Pro GT असं असेल.
यामध्ये स्लायडर देण्यात आला असून याद्वारे फ्रंट कॅमेरा सुरु करता येईल. स्लायडरची सोय डिस्प्लेचा नॉच हटवून पूर्णपणे स्क्रिन उपलब्ध करून देण्याचा नवा प्रयत्न म्हणता येईल! 12GB रॅममुळे एकावेळी ५० अॅप्स उघडू शकाल असा दावा लेनोवोने केला आहे! रंगासाठी कार्बन फायबरचा वापर केलेला पाहायला मिळेल!
Lenovo Z5 Pro GT Specs :
डिस्प्ले : 6.39-inch (1080×2340 pixels) Full HD+ Super AMOLED 19.5:9
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 855
GPU : Adreno 640
रॅम : 12GB
स्टोरेज : 512GB
कॅमेरा : 16 MP, f/1.8 + 24 MP, 1/2.8″, 0.9µm
फ्रंट कॅमेरा : 16 MP + 8 MP dual selfie
बॅटरी : 3350mAh with fast charging
ऑपरेटिंग सिस्टिम : Android 8.1
सेन्सर्स : Infrared face recognition, fingerprint (under display), accelerometer, gyro, proximity, compass,Corning Gorilla Glass protection
किंमत : ~$ 635(~४५२८०) (अधिकृत भारतीय किंमत नंतर सांगण्यात येईल)