फेसबुकवरच्या बऱ्यापैकी सर्वच सुविधा आता इंस्टाग्रामवर येऊ लागल्या आहेत. यामध्ये आता व्हॉइस मेसेजिंगचा सुद्धा समावेश होत आहे. आजपासून इंस्टाग्रॅमच्या डायरेक्ट या मेसेजिंग सुविधेमध्ये व्हॉइस मेसेजद्वारे बोलून संदेश पाठवता येतील! काही महिन्यांपूर्वी मेसेंजरमध्ये ही सोय दिल्यानंतर आता तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेल्या इंस्टाग्रामवर ही सोय देण्यात आली आहे.
मायक्रोफोन बटन दाबून ऑडिओ/व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा त्यादरम्यान ऑडिओ वेव्ह वाहतअसल्याचं ऍनिमेशन आपल्याला दिसेल. आपण एक मिनिटाचा व्हॉइस मेसेज पाठवू शकाल. हे मेसेज कायम ऐकता येतील. हे थेट मित्रांसोबत चॅट प्रमाणे काम करतील. अँड्रॉइड व iOS दोन्हीवर ही सोय उपलब्ध झाली आहे.
अधिक माहिती : Voice message on Instagram