हुवावेचा 48MP कॅमेरा असलेला Honor View 20 फोन सादर!

गेली काही वर्षं स्मार्टफोन्समध्ये काहीच नावीन्य दिसून येत नव्हतं आता मात्र अलीकडे डिस्प्लेच्या बाबतीत कंपन्या सातत्याने नवनवे डिझाइन्स सादर करून डिस्प्लेचा आकार मोठा करण्याच्या प्रयत्नात दिसून येत आहेत. डिस्प्लेनंतर मोठं वेगळेपण दाखवण्याची जागा म्हणजे कॅमेरा. आता बघता बघता दोन, तीन, चार, पाच कॅमेरा फोन्समध्ये जोडले जात आहेत! आता यापुढे जाऊन हुवावेने हॉनर या ब्रँड अंतर्गत Honor View 20 जाहीर केला असून यामध्ये चक्क 48 मेगापिक्सलचा कॅमेरा असणार आहे! होय 48MP असलेला कॅमेरा एका स्मार्टफोनमध्ये!

हा फोन कॅमेरा सेन्सरसाठी  Sony IMX586 चा वापर करून तब्बल ४८ मेगापिक्सल रेजोल्यूशन असलेले फोटो काढू शकेल. याआधी काही वर्षांपूर्वी नोकियाने असा ४१ मेगापिक्सल असलेला Nokia 808 PureView फोन सादर केला होता जो नंतर मायक्रोसॉफ्टकडे गेल्यावर Lumia 1020 या नावाने विंडोज ओएससह सादर झाला होता. त्यानंतर त्या फोनला मागे टाकेल असा हा Honor View 20!
या फोनचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे डिस्प्लेमध्येच असलेला फ्रंट कॅमेरा सॅमसंगच्या Galaxy A8s नंतर या फोनमध्ये असा डिस्प्ले पाहायला मिळेल. अर्थात दोन्ही कंपन्या आता हा डिस्प्ले कुणी आधी सादर केला याविषयी श्रेय घेण्याच्या प्रयत्नात दिसून येत आहेत! सोबत शायोमी पण या 48MP कॅमेरा आणि डिस्प्लेमध्ये फ्रंट कॅमेराच्या शर्यतीत भाग घेत असल्याचं सांगण्यात येत आहे  

Honor View 20 मध्ये Kirin 980 हा प्रोसेसर असेल आणि  EMUI 9 या ऑपरेटिंग सिस्टिमवर हा फोन काम करेल जी अँड्रॉइड ९ पाय वर आधारित आहे. या फोनबद्दल अधिक माहिती २२ जानेवारीला हा फोन जगभर सादर होईल तेव्हा प्रसिद्ध केली जाईल!

Image : andridcentral

  

Exit mobile version