एबीपी माझा आयोजित ‘माझा महाराष्ट्र, डिजिटल महाराष्ट्र’ या कार्यक्रमात महाराष्ट्रात विविध क्षेत्रातील योगदानाद्वारे महाराष्ट्रातील व मराठी भाषेसंबंधित कार्य करणाऱ्या मंडळींची चर्चासत्र आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाद्वारे मराठीटेकच्या सूरज बागल यांनीही मराठीटेकचा प्रवास थोडक्यात मांडला. याच कार्यक्रमात ‘ब्लॉग माझा 2018’ स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आणि विजेत्यांना मा. मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते गौरवण्यात आलं.
कार्यक्रमाच्या चर्चासत्रांमध्ये सहभागी व्यक्ती आणि चर्चा समन्वयक खालीलप्रमाणे
डिजिटल एन्टरटेन्मेंट :
- नितीन पवार (गावाकडच्या गोष्टी वेब सीरिजचे दिग्दर्शक)
- अमेय वाघ (अभिनेता) व निपुण धर्माधिकारी (अभिनेता, दिग्दर्शक)
चर्चा समन्वयक : सौमित्र पोटे
डिजिटल एज्युकेशन :
- अनिल सोनूने (शिक्षक, जिल्हा परिषद शाळा, औरंगाबाद)
- दीपाली सावंत (जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक, वर्धा)
- रणजीत दिसले (जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक, कदमवस्ती, ता माढा, जिल्हा सोलापूर)
- भाऊसाहेब चास्कर (हंगामी शिक्षक, जिल्हा परिषद शाळा, अकोले, अहमदनगर)
चर्चा समन्वयक : हर्षल विभांडिक (इन्वेस्टमेंट बँकर, इंटरनॅशनल कॅपिटल पार्टनर्स)
डिजिटल फ्यूचर :
- मानस गजरे (संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, झबुझा लॅब्ज, मोबाईल अॅप मेकिंग अँड मेकिंग कंपनी)
- दीपक घैसास (अर्थतज्ज्ञ आणि उद्योजक)
चर्चा समन्वयक : शेखर पाटील
चॅलेंजेस ऑफ फेक न्यूज
- ब्रिजेश सिंह (महासंचालक, माहिती आणि प्रसार)
- निवेदिता निरंजन कुमार (फॅक्ट चेक, बुम लाईव्ह)
- प्रशांत माळी (वकील)
- आनंद मांगले (संशोधक आणि सामाजिक कार्यकर्ते)
चर्चा समन्वयक : मेघराज पाटील
या कार्यक्रमादरम्यान सोशल मीडियावरील फेसबुक, ट्विटर आणि युट्युब अशा माध्यमांवर मायमराठी जपणाऱ्या मंडळींनासुद्धा त्यांच्या उपक्रमांविषयी माहिती देत चर्चा करण्याची संधी एबीपी माझाने दिली!
या सत्राचा व्हिडीओ : मराठी सोशल मीडिया : डिजिटल महाराष्ट्र
या सत्रात खालील व्यक्तींचा समावेश होता :
सौरभ पाटील (बोल भिडू), गोपाळ मदने (ट्विटर कट्टा, मराठी ब्रेन), विनीत वैद्य (मराठी किडा), जीवन कदम (जीवन कदम व्लॉग), मृणाल पाटोळे (ज्ञानभाषा मराठी), कल्याणी मित्रगोत्री (सेलेब्रिटी मॅनेजर), सूरज बागल (मराठीटेक), चंदन तहसीलदार (मराठी बोला चळवळ), राहुल वेळापुरे (मराठी रिट्विट), हेमंत आठल्ये (हॅशटॅग मराठी), पवन चौधरी (डिजिटल फ्लेम), शैलेश फडतरे (ब्रोनॅटो), सुशील सोनार (माझं नाटक), निखिल शिंदे (संवादसेतू)
डिजिटल महाराष्ट्र मध्ये बोलताना सूरज बागल (मराठीटेक) |
अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करून सोशल मीडियामधल्या मंडळींना चर्चेसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल मराठीटेकतर्फे मी सूरज बागल एबीपी माझा आणि मेघराज पाटील यांचे मनापासून आभार मानतो. तसेच कार्यक्रमासाठी विनीत वैद्य यांचं सहकार्य मोलाचं होतं.
ब्लॉग माझा स्पर्धेचे विजेते आणि त्यांच्या ब्लॉग्सची लिंक :
परीक्षक : मुकेश माचकर (ज्येष्ठ पत्रकार), राम जगताप (संपादक – अक्षरनामा)
विजेते :
- पंकज समेळ : ‘महाराष्ट्र देशा‘
- राजेंद्र झगडे : ‘अनुभव….क्षण वेचलेले‘
- मुग्धा शेवाळकर आणि सचिन मणेरीकर : ब्लॉग ‘शब्द तुझे मी माझे‘
उत्तेजनार्थ :
- नितीन साळुंखे : ‘नितीन साळुंखे ब्लॉग‘
- पूजा ढेरिंगे : ‘सूफी‘
- अनुराधा कुलकर्णी : ‘मी अनु‘
- दुष्यंत पाटील : ‘मुशाफिरी कलाविश्वातली‘
- अमोल कुलकर्णी : ‘विज्ञानयात्री‘
माहिती सौजन्य : एबीपी माझा Majha Maharashtra Digital Maharashtra by ABP Majha