शायोमीची रेडमी नोट मालिकेमधील फोन्स हे अलीकडे भारतात सर्वात लोकप्रिय फोन्स आहेत. यांनी विक्रीमध्ये गेली तीन चार वर्षे आघाडीवर राहत असून स्वस्त किंमतीत उत्तम सुविधा देऊन नंतर सर्व्हिस बाबतसुद्धा इतरांच्या मानाने चांगलं काम केल्यामुळे त्यांना एव्हढ्या मोठ्या प्रमाणात यश मिळत असल्याचं दिसत आहे. आता या प्रसिद्ध नोट मालिकेतल्या Redmi Note 5 Pro ची पुढची आवृत्ती Note 6 Pro आज सादर करण्यात आली आहे! यामध्ये मोठ्या डिस्प्लेसह आणखी सुधारणा करून फोटोग्राफीला समोर ठेवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. कालच शायोमीने देशभरात ५०० ऑफलाईन दुकाने सुरु करत असल्याची घोषणा केली होती.
यामध्ये फ्रंट कॅमेरात मुख्य 20MP कॅमेरा सोबत 2MP डेप्थ कॅमेरा जोडला असून AI च्या साहाय्याने आता आणखी सुंदर (!) सेल्फी काढता येतील! AI Portrait 2.0, Light Trails, Studio Lighting, Adjustable bokeh अशा सॉफ्टवेअर सुविधा जोडण्यात आल्या असून इतरांच्या मानाने Note 6 Pro अधिक चांगल्या प्रकारे फोटो काढेल असा दावा शायोमीने केला आहे. हा फोन ड्युअल सिम ड्युअल VoLTE असल्यामुळे दोन्ही सिममध्ये 4G कॉलिंगची सुविधा वापरता येईल. इतर कंपन्या नॉच लहान करण्याच्या प्रयत्नात असताना यांनी एव्हढा मोठा नॉच मात्र आहे तसाच ठेवला आहे. सोबत Type C ऐवजी जुनाच Micro USB पोर्ट दिला आहे. हेडफोन जॅक मात्र अजूनही आहे! प्रोसेसरसुद्धा Snapdragon 636 जुनाच पुन्हा जोडण्यात आल्यामुळे काही प्रमाणात यूजर्सना नाराज करणार आहे. हा फोन २३ नोव्हेंबरपासून उपलब्ध होत आहे.
Redmi Note 6 Pro Specs :
डिस्प्ले : 6.26 inch 19:9 Full Screen 2280×1080 FHD+, 403 PPI
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 636 with Adreno 509 GPU
रॅम : 3GB/4GB
स्टोरेज : 32GB/64GB
बॅटरी : 4000mAh with Quick Charge 3.0
ऑपरेटिंग सिस्टिम : MIUI 10
कॅमेरा : 12MP + 5MP AI dual camera, f/1.9+f/2.2, EIS, Dynamic Bokeh, AI Portrait 2.0, Light Trails, Studio Lighting, Adjustable bokeh
फ्रंट कॅमेरा : 20MP + 2MP front camera, f/2.0+f/2.2, AI portrait selfie, Beautify 4.0
रंग : Blue, Black, Red, Rose Gold
सेन्सर : Rear fingerprint sensor, IR blaster, Gyroscope, Accelerometer, Distance sensor, Ambient light sensor, Electronic compass, Hall effect sensor
इतर : Bluetooth 5.0, 5G WiFi
बॉक्समध्ये : Redmi Note 6 Pro / Power adapter / USB 2.0 cable / Warranty card / User guide / Clear soft case / SIM Insertion tool
किंमत : हा फोन फ्लिपकार्ट व Mi.com वर २३ नोव्हेंबर दुपारी १२ पासून उपलब्ध होईल.
3GB+32GB ₹१३९९९
4GB+64GB ₹१५९९९