सध्याची रीचार्ज प्लॅन्सची स्थिती! : टॉपअप पॅक्स जवळपास बंदच?

काही दिवसांपासून आपण टॉप अप रिचार्ज करण्याचा प्रयत्न केला असेल तर तो पर्याय उपलब्ध नसल्याचे पाहिलं असेलच. आयडिया, व्होडाफोन, एअरटेल या टेलिकॉम कंपन्यांकडून टॉप अप रिचार्ज प्लॅन्स सध्या बंद करण्यात आले आहेत (१०, १०००, ५०००.. वगैरे वगळता) त्याचबरोबर जे नवीन टॉप अप रिचार्ज (कॉम्बो) प्लॅन्स उपलब्ध आहेत त्यांची वैधता (व्हॅलिडिटी) आता पूर्वीसारखी अनलिमिटेड नसून ठराविक दिवसांसाठीच (१४, २८,… दिवस वगैरे) असणार आहे. यामुळे ग्राहकांना आता ठराविक व्हॅलिडिटी असणाऱ्या रिचार्जचाच पर्याय निवडावा लागणार आहे.

जिओच्या आगमनानंतर घसरलेली परिस्थिती पूर्ववत आणण्याच्या प्रयत्नात टेलिकॉम कंपन्या असून याद्वारे प्रत्येक ग्राहकांकडून येणारी सरासरी रक्कम वाढविण्याचा प्रयत्न आहे. आजकाल अनेकांकडे २-३ नंबर असतात अशामुळे  प्रायमरी नंबरवर दरवेळेस रिचार्ज केले जाते तर इतर नंबरवर क्वचितच, परंतु यामुळे आता ठराविक काळानंतर आपणास रिचार्ज करणे भाग पडणार आहे.

उदाहरणार्थ पूर्वी आपण टॉप अप रिचार्ज केल्यास अनलिमिटेड व्हॅलिडिटीमुळे जोपर्यंत बॅलन्स शून्य होत नाही तोपर्यंत आपणास रिचार्जची गरज पडत नसे परंतु आता पॅक ठराविक व्हॅलिडिटीसह येत असल्याकारणाने आपण तो बॅलन्स वापरला नाही तरीसुद्धा संपणार आहे.

खरेतर जिओतर्फे टॉप अप रिचार्ज पॅक उपलब्ध नसल्यामुळे आपणास प्रत्येक महिन्याला जिओसाठी कमीतकमी ९८ रुपयांचे रिचार्ज करावेच लागते. या नवीन बदलामुळे खरंतर दिवसाला 1GB वगैरे सारखे प्लॅन्स वापरणाऱ्याना काहीही फरक पडणार नसला तरी अनेक सिमकार्ड वापरणारे तसेच टॉप अप रिचार्जवर असणाऱ्या नंबरमुळे काही प्रमाणात बिलाची रक्कम नक्कीच वाढणार आहे.

Exit mobile version