वनप्लस या भारतातील प्रीमियम स्मार्टफोन बाजारात सर्वात पुढे असलेल्या कंपनीचा नवा OnePlus 6T आज सादर झाला आहे. डिस्प्लेखाली किंवा डिस्प्लेमध्येच असलेला फिंगरप्रिंट असणारा हा फोन वनप्लस 6 मध्ये सुधारणा करून सध्याच्या हार्डवेअर स्टँडर्डसोबत जोडून उपलब्ध करून देण्यात येत आहे. उत्तम कॅमेरा, चांगलं सॉफ्टवेअर, डिस्प्ले आणि मध्यम किंमत या नेहमीच्या गोष्टी या फोनसोबतसुद्धा देण्यात आलेल्या आहेत. फोटोग्राफीसाठी स्टुडिओ फोटोग्राफी नावाची नवी सोय असून यामुळे काढलेले पोट्रेट फोटो स्टुडिओ लाईटमध्ये काढल्यासारखे दिसतात. नाईटस्केप नावाच फिचर रात्री किंवा काढलेले फोटो उत्तम असतील!
यावेळी खास नवी सोय म्हणजे हा डिस्प्लेमधेच असलेला फिंगरप्रिंट स्कॅनर. आता फोनच्या डिस्प्ले मोठा करण्याच्या नादात अॅपलसारख्या कंपन्यांनी फिंगरप्रिंट स्कॅनरच काढून टाकला आहे. मात्र ओप्पो आणि विवो यांच्यानंतर आता वनप्लसने सुद्धा डिस्प्लेमध्येच फिंगरप्रिंट स्कॅनर द्यायला सुरुवात केली आहे.
यासोबत सादर करण्यात आलेले बुलेट्स वायरलेस इयरफोनची किंमत $69 असेल. तर वनप्लस Type C इयरबड्सची किंमत $19.95 असेल.
OnePlus 6T Specs :
डिस्प्ले : 6.41″ 19.5:9 Full Optic AMOLED Screen 2280 x 1080 pixels Supports sRGB
प्रोसेसर : Snapdragon 845 with Adreno 630 GPU
रॅम : 6GB/8GB
स्टोरेज : 128/256GB
बॅटरी : 3700mAh with Fast Charge
ऑपरेटिंग सिस्टिम : OxygenOS (Based on Android 9 Pie)
कॅमेरा : 20MP+16MP OIS+EIS f/1.7 480fps slowmo
फ्रंट कॅमेरा : 16MP f/2.0 Portrait Mode, Studio Lighting
रंग : Mirror Black / Midnight Black
सेन्सर : In Display Fingerprint Sensor, Hall, Accelerometer, Gyroscope, Proximity, RGB Ambient Light Sensor, Electronic Compass, Sensor Core
इतर : 2.5D Corning Gorilla Glass 6, Dirac HD Sound, Dirac Power Sound, Bluetooth 5.0
लिंक : https://amzn.to/2PAeCYC
किंमत :
6GB+128GB ₹३७,९९९
8GB+128GB ₹४१,९९९
8GB+256GB ₹४५,९९९