आज लेनोवो इंडियातर्फे लेनोवो K9 आणि A5 असे दोन स्मार्टफोन सादर करण्यात आले आहेत. बजेट सेगमेंट मध्ये उपलब्ध असणाऱ्या फोन्समध्ये या फोन्समुळे ग्राहकांना आणखी पर्याय उपलब्ध झाले आहेत. लेनोवोने जवळपास एका वर्षानंतर भारतीय बाजारपेठेत नवीन फोन उपलब्ध करून दिला आहे.
Lenovo K9
लेनोवो K9 मध्ये ड्युअल सेल्फी तसेच रिअर कॅमेरा असून त्याद्वारे बोके इफेक्ट, नॅचरल सेल्फी बोके, ९ लेव्हल बोके इफेक्ट, AI लो लाईट कॅमेरा असे फीचर्स मिळतील. त्याचबरोबर HD+ स्क्रीन, फेस अनलॉक, फिंगरप्रिंट सेन्सर, USB Type-C, फास्ट चार्ज सपोर्ट, Dual VoLTE Support चा समावेश यामध्ये आहे.
Lenovo K9 Specifications:
डिस्प्ले : 5.7inch (14.48cm) (1440х720) HD+
प्रोसेसर : MediaTek P22
GPU: IMG GE8320
रॅम : 3GB
स्टोरेज : 32GB (Expandable upto 256GB)
बॅटरी : 3000mAh
ऑपरेटिंग सिस्टिम : Android 8.1 Oreo
कॅमेरा : 13MP+5MP
फ्रंट कॅमेरा : 13MP+5MP
रंग : Black, Blue
सेन्सर :Fingerprint Sensor, Proximity Sensor, Accelerometer, Ambient Light Sensor
इतर : Dual 2.5D Glass, Dual Sim + micro SD Card Slot(Hybrid), Bluetooth 4.2, 3.5mm Audio Jack, USB Type-C
किंमत : ₹8,999 (3GB+32GB)
Lenovo A5
लेनोवो A5 मध्ये फेस अनलॉक, फिंगरप्रिंट सेन्सर त्याचबरोबर 4000 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून ड्युअल सिम सोबत 256GB पर्यंत मेमरी वाढविण्यासाठी अधिकचा स्लॉट उपलब्ध आहे. हा फोन सुरुवातीस ब्लॅक आणि गोल्ड रंगामध्ये उपलब्ध असेल.
Lenovo A5 Specifications:
डिस्प्ले : 5.45-inch (13.8cm) (1440х720) HD+ Display
प्रोसेसर : MediaTek MT6739
रॅम : 2GB/3GB
स्टोरेज : 16/32GB(Expandable upto 256GB)
बॅटरी : 4000mAh
ऑपरेटिंग सिस्टिम : Android 8.1 Oreo
कॅमेरा : 13MP
फ्रंट कॅमेरा : 8MP
रंग : Black, Gold
सेन्सर : Fingerprint Sensor, Proximity Sensor, Accelerometer, Ambient Light Sensor
इतर : Dual Sim + microSD Card Slot, Bluetooth 4.2, 3.5mm Audio Jack, GPS Support
किंमत : ₹5,999 (2GB+16GB)
₹6,999 (3GB+32GB)