एचपीचा नवा ENVY x360 लॅपटॉप सादर

HP कंपनीतर्फे आज HP ENVY x360 लॅपटॉप सादर करण्यात आला असून तो HP इंडियाच्या वेबसाईटवरून आजपासूनच प्री-ऑर्डर करता येईल. हा लॅपटॉप AMD Ryzen 3 आणि Ryzen 5 प्रोसेसरसोबत उपलब्ध असून Ryzen 3 सोबत AMD Radeon Vega 6 Graphics तर Rayzon 5 सोबत AMD Radeon Vega 8 Graphics चा समावेश आहे.

HP ENVY x360 लॅपटॉप Convertible PC असून AMD Ryzen 3/5 प्रोसेसरसोबतच, 13.3 inch टच स्क्रीन FHD डिस्प्ले, Audio by Bang & Olufsen, 4/8GB RAM व AMD Radeon Vega 6/8 ग्राफिक्सचा समावेश असेल. या लॅपटॉपसोबत चांगल्या परफॉर्मन्ससाठी 128/256GB SSD (Solid State Drive) देण्यात आली आहे.

HP ENVY x360 लॅपटॉपची किंमत ₹६०,९९० पासून सुरु होत असून पुढील मॉडेल ₹७४,९९० रुपयांमध्ये उपलब्ध असेल. हे लॅपटॉप प्री ऑर्डरसाठी कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध झाले आहेत.



HP ENVY x360 Specifications:
प्रोसेसर : AMD Ryzen 3/5 (2 GHz base frequency, up to 3.4 GHz burst frequency)
स्क्रिन : 13.3inch FHD IPS Touchscreen Display (1920*1080)
रॅम : 4/8GB DDR4- 2400 SDRAM (onboard)
ग्राफिक्स: AMD Radeon Vega 6/8 Graphics
ड्राईव्ह :128/256GB Solid State Drive
बॅटरी : 53.2WHr, 4-Cell Battery (Integrated)
पोर्ट : HDMI 2.0 , 1 USB 3.1Type-C, 2 USB 3.1, 1 USB 2.0, 1 Headphone/Micropohone combo
सॉफ्टवेअर : Windows 10 Home 64Bit
इतर:  Backlight Keyboard, Corning Gorilla Glass NBT Touchscreen, Quick Login with IR Camera, Audio by Bang & Olufsen
किंमत – ₹६०,९९०/₹७४,९९०
लिंक –  HP ENVY x360

Exit mobile version