गूगल प्लसच्या लाखो यूजर्सचा गोपनीय डेटा गूगलकडून उघड पडला असून त्याबाबत गूगलने चक्क माहिती न देण्याचं ठरवत ही गोष्ट लपवून ठेवली! ही गोष्ट जाहीर केली असती तर कायदेशीर गोष्टींना सामोरं जावं लागलं असतं आणि प्रतिष्ठेचा प्रश्न असल्याची भीती असल्यामुळे गूगलने ही बातमी बाहेर येऊ दिली नाही असं सांगण्यात येत आहे. याबाबत वॉल स्ट्रीट जर्नलने माहिती प्रसिद्ध केली आहे.
या घटनेवर उपाय म्हणून अल्फाबेट (ज्या कंपनीकडे गूगलची मालकी आहे) कंपनीतर्फे गूगल प्लस यूजर्ससाठी कायमच बंद करत असल्याचं जाहीर केलं आहे! फेसबुकसोबत स्पर्धा करण्यासाठी २०११ मध्ये सुरु करण्यात आलेलं हे सोशल नेटवर्क कधीच फारसं वापरात आलं नाही आणि आता या घटनेमुळे का होईना गूगलने ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे! गूगल प्लस गूगलच्या उत्पादनांमध्ये एक फसलेलं प्रॉडक्ट मानलं जातं.
सॉफ्टवेअरमध्ये असलेल्या काही त्रुटींमुळे २०१८ ते मार्च २०१८ दरम्यान बाहेरच्या डेव्हलपर्सना व्यक्तिगत प्रोफाईल्सना सुद्धा ऍक्सेस मिळत होता. याबाबत गूगलच्या अंतर्गत अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आणि त्यांच्या सर्वानुमते ही माहिती बाहेर जाऊ न देण्याचं ठरवून आजवर लपवून ठेवण्यात आली! जवळपास त्याच वेळी इतर कंपन्यांवर आरोप होत होते जसे की फेसबुकचं केंब्रिज अनॅलिटिका त्यामुळे आपलीही बदनामी होईल आणि लगेच कायदयाच्या कचाट्यात सापडू असं गूगलच्या कायदेतज्ञाना वाटलं.
गूगल + बंद करण्यासोबत गोपनीयता जपण्यासाठी अनेक बदल करण्यात येणार असून API मधील नव्या बदलांमुळे डेव्हलपर्सना अँड्रॉइड व जीमेल यूजर डेटा घेताना मर्यादा येतील. इथून पुढे कॉल लॉग आणि SMS ची परवानगी मिळणार नाही!
अधिकृत माहिती : Protecting your data and sunsetting consumer Google+
search terms : google plus shutting down due to security lapses and exposed user data