फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज दरम्यान विक्रीचे नवे उच्चांक!

१० ते १४ ऑक्टोबरदरम्यान ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टवर बिग बिलियन डेज तर अॅमेझॉनवर त्यांचा ग्रेट इंडियन सेल पार पडला. इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून ते फॅशन व इतर गोष्टींवर अनेक ऑफर्स ग्राहकांना उपलब्ध होत्या. यावेळी दिवाळीच्या वेळेस होणारी खरेदी लक्षात घेऊन अॅमेझॉन व फ्लिपकार्ट दोघांनी त्यांचे सेल एकाच दिवशी सुरु ठेवले होते या सेल दरम्यान वस्तूंची मोठी विक्री झाल्याचे समोर येत असून ग्राहकांना सुद्धा या ऑफर्सद्वारे मोठा फायदा झाला आहे.

बिग बिलियन डेज बद्दल फ्लिपकार्टने माहिती उपलब्ध केली आहे. या ५ दिवसांच्या सेलची आकडेवारी फ्लिपकार्टतर्फे देण्यात आली आहे.

  • १० हजारहून अधिक कर्मचारी तर १ लाखाहून अधिक विक्रेत्यांचा समावेश असल्याचे फ्लिपकार्टतर्फे सांगण्यात आले आहे. 
  • एका दिवसांत ३० लाख स्मार्टफोन्सची विक्री झाली 
  • दर तासाला १२० आयपॅड्स
  • प्रत्येक सेकंदाला ५ शूज
  • प्रत्येक मिनिटाला ५० मिक्सर ग्राइंडरची खरेदी
  • विकेलेल्या एकूण बल्बनी २७ स्टेडीयम प्रकाशित करता येतील!
  • एरवी भारतात तासाला होणार्‍या फोन्सच्या विक्रीच्या ७० पट अधिक वेगाने विक्री!

अधिकृत माहिती :  Thank You India By Flipkart

2GUD या काही दिवसांपूर्वीच सादर करण्यात आलेल्या प्लॅटफॉर्मवर सेलच्या सुरवातीच्या दिवसांत ३५ टक्के वाढ झाली  असून या दिवसांत फ्लिपकार्टने अनेक छोट्या मनोरंजक गेमसुद्धा उपलब्ध करून दिल्या होत्या त्यामुळे या दिवसात फ्लिपकार्ट भारतातील सर्वात मोठा गेमिंग प्लॅटफॉर्म असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. 

Exit mobile version