उपयोगी अॅप्सची ओळख करून देणारी मालिका : अॅपमित्र #1


सध्या गूगल प्ले स्टोअरवर लाखो अॅप्स उपलब्ध आहेत. विविध गोष्टींसाठी हजारो पर्याय आपणासमोर असताना अनेक चांगले पर्याय पाहायचे राहून जातात यासाठीच आम्ही काही अॅपची यादी सोबतच त्याबद्दल थोडी माहिती या लेखामध्ये घेऊन आलो आहोत.

SMS Organizer :-

दररोज येणारे व नको असलेले प्रोमोशनल मेसेज, ऑफर्स, स्पॅम मेसेज आणि त्यामुळे सततच्या नोटिफिकेशन्स यापासून सुटका करून घ्यायची असेल तर मायक्रोसॉफ्टतर्फे उपलब्ध असणारे SMS Organizer अॅप उत्तम आहे. यामध्ये येणाऱ्या मेसेजची पर्सनल, प्रोमोशन्स, Transactions अशा प्रकारात विभागणी केलेलं असून यामुळे प्रोमोशन्स, ऑफर्सचे मेसेज आल्यास नोटिफिकेशन दिली जात नाही. त्याबरोबरच महत्वाचे मेसेज पर्सनल टॅब मध्ये उपलब्ध असल्याने ते सततच्या येणाऱ्या ऑफर्सच्या ढिगाऱ्यात न जाता सुस्पष्टपणे नजरेस पडतात. हे अॅप ऑफलाईन वापरता येत असून यामध्ये स्मार्ट रिमाइंडर, डार्क थीम, बॅकअप तसेच स्मार्ट असिस्ट द्वारे तिकीट पाहण्याचा पर्याय उपलब्ध आहे. 
डाउनलोड लिंक – SMS Organizer – Clean, Blocker, Reminders & Backup

Pocket:-

अनेक वेळा आपण इंटरनेटवर ब्राऊज करताना विविध चांगले आर्टिकल, लेख आपणासमोर येतात परंतु वेळेअभावी ते वाचण्याचे तसेच सेव्ह करण्याचे राहून जातात अशासाठीच पॉकेट अॅप उत्तमरीत्या मदत करते. सोशल मीडिया असो किंवा इंटरनेटवर इतरत्र आपणसमोर एखादा लेख, चांगली माहिती आली तर आपण तो लेख/लिंक व्हॉटसअॅप वगैरेवर शेअर करतो अगदी  त्याप्रमाणेच पॉकेट अॅपवर शेअर करायचा आणि यानंतर आपण केव्हाही तो लेख/आर्टिकल पॉकेट अॅपवरून किंवा त्यांच्या वेबसाईटवरून वाचू शकता. यामध्ये आणखी एक फायदा असा की लेख वाचताना रिडींग मोड मध्ये दिसत असल्याकारणाने वाचताना चांगला अनुभव येतो. डेस्कटॉप/लॅपटॉप वर आपण पॉकेट एक्स्टेंशन घेऊन कोणत्याही लिंक वर किंवा पेज वर असताना राइट क्लिक केल्यास सेव्ह टू पॉकेट म्हणून पर्याय आपणासमोर येईल त्याद्वारे झटपट सेव्ह सुद्धा करता येईल. आपण लेख/ आर्टिकल शेअर केल्यानंतर तो डाउनलोड केला जात असल्याने नंतर केव्हाही आपण इंटरनेटशिवाय वाचू शकता. 
अॅप डाउनलोड लिंक – Pocket: Save. Read. Grow 
वेब लिंक – https://app.getpocket.com (तसेच अनेक ब्राऊजरसाठी ब्राऊझर एक्स्टेंशन उपलब्ध आहे) 

Snapseed :- 

स्नॅपसीड हे गूगल तर्फे तयार करण्यात आलेले फोटो एडिटर अॅप असून यामध्ये फोटो एडिट करण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. जवळपास २९ टूल्स आणि फिल्टर यामध्ये उपलब्ध आहेत जसे की ब्रश, Healing, Structure, HDR, Perspective. फोटो रोटेट, क्रॉप करणे त्यासोबतच फोटोवर लिहिण्यासाठी पर्याय यामध्ये मिळतील. सोबतच Lens Blur, Glamour Glow, Curves, Frames, Face Enhance सारखे पर्याय आपण वापरू शकता. 
डाउनलोड लिंक – Snapseed

Google Translate – 

गुगल तर्फे हे अॅप उपलब्ध असून यामध्ये इंग्लिश-मराठी आणि मराठी – इंग्लिश भाषांतरासाठी पर्याय आहेत. मटेरियल डिझाईन सोबतच वापरण्यासाठी सोपे असे हे अॅप असून प्ले स्टोअर वर मोफत उपलब्ध आहे. या अॅपमध्ये आपण मराठी सोबतच इतरही भाषांचे शब्द  पाहू शकता. तसेच https://translate.google.com वरून सुद्धा अॅपचा वापर न करता आपण शब्दांचे अर्थ पाहू शकता. 
डाउनलोड लिंक – Google Translate 
Exit mobile version